जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'धान्याच्या पेटीत ज्याच्यावर गोळ्या झाडल्या ते माझे...'The Kashmir Files मधील ते दृश्य पाहून तरुणीने सांगितली आपबीती

'धान्याच्या पेटीत ज्याच्यावर गोळ्या झाडल्या ते माझे...'The Kashmir Files मधील ते दृश्य पाहून तरुणीने सांगितली आपबीती

The Kashmir Files

The Kashmir Files

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील ते दृश्य पाहून तरुणीने सांगितली भयानक आठवण

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च-   विवेक अग्निहोत्री  (Vivek Agnihotri)   यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files)  हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. परंतु दुसरीकडे चित्रपटावरून अनेक वाद-विवादसुद्धा होत आहेत. सोशल मीडियावरसुद्धा दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता चित्रपटाबाबत एक नवी गोष्ट समोर आली आहे. काय आहे ही नेमकी गोष्ट जाणून घेऊया. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात एक दृश्य चित्रित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती धान्याच्या पेटीत लपून बसलेला असतो. आणि त्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात येतात. याच दृश्यावरून एक गोष्ट समोर आली आहे. खरं तर ही घटना ज्या व्यक्तीसोबत घडली होती, त्यांची पुतणी समोर आली आहे. दूरसंचार अधिकारी बाळ कृष्ण गंजू यांच्या पुतणीने या घटनेवर भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की, ‘ज्या व्यक्तीवर धान्याच्या पेटीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ते माझे काका होते. त्यांच्यावर अंधाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या होत्या’. त्यांची ही पुतणी सध्या कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट जबरदस्त चर्चेत आहे. या चित्रपटावरून अनेक वादविवाद आलेले समोर येत आहेत. यावर अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. सोशल मीडियावर चित्रपटबाबत दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान राजस्थानमधील कोटा याठिकाणी 22 मार्च ते 21 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी याबाबत विरोध दर्शवला आहे. शिवाय त्यांनी बीजेपी आपल्या राजकीय फायद्यासाठी ‘द काश्मीर फाईल्स’ चा वापर करत असल्याचा विरोध केला आहे. (हे वाचा: The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचे सेनेच्या आरोपाला शिवसेना स्टाईल उत्तर ) या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात 1990 मधील काश्मिरी पंडितांच्या पलायनाशी संबंधित घटना मांडण्यात आल्या आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात