नवी दिल्ली, 21 मार्च: ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सध्या देशभरात चर्चेत आहे. एकिकडे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, सुरु असलेल्या वादावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शिवसेनेलाही त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. अग्निहोत्री यांनी काश्मीर हा ‘व्यवसाय’ असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटामुळे अनेकांची दुकाने बंद होत असून त्यामुळे विनाकारण वाद निर्माण होत आहे. अग्निहोत्री यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, चित्रपटात कोणताही वाद नाही. दहशतवादावर काही वाद होऊ शकतो का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे जग मानवतेच्या आणि दहशतवादाच्या भागात विभागले गेले आहे. माणुसकीचे लोक हा चित्रपट लाईन लावून बघत आहेत तर दहशतवादाचे लोक याविरोधात अपप्रचार करत आहेत. तसेच, ‘काश्मीर फाइल्स’ देशातील प्रत्येक विभागाला जोडत असल्याचा दावा अग्निहोत्री यांनी केला आहे. या चित्रपटाने चित्रपट हिट बनवण्याचा जुना स्टिरिओटाईप मोडून टाकला आहे आणि मनोरंजन विश्वाच्या अर्थव्यवस्थेला नवे मार्ग दाखवले आहेत. चित्रपटात अर्धसत्य दाखवल्याच्या शिवसेनेच्या आरोपाबाबत अग्निहोत्री यांना विचारले असता, अर्धसत्य बोलण्याचा अधिकार पूर्ण सत्य जाणणाऱ्यालाच आहे, असे थेट प्रत्युत्तर अग्निहोत्री यांनी शिवसेनेला दिले. हा चित्रपट वादात सापडला आहे असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या उद्देशासाठी मी हा चित्रपट बनवला तोच उद्देश पूर्ण होत आहे. ज्यांचा काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर विश्वास नव्हता, त्यांचे या चित्रपटाने डोळे उघडले आहेत. काश्मिरी पंडितांनाही चित्रपटाच्या कमाईचा काही भाग मिळेल का, चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले की, आधी कमाई असली पाहिजे. विशेष म्हणजे, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती अभिनीत ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात 1990 मधील काश्मिरी पंडितांच्या पलायनाशी संबंधित घटना मांडण्यात आल्या आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.