सुशांतचं शेवटचं गाणं केवळ 11 लोकांनी पाहिलं? युट्यूबवरील VIEWS अचानक गायब

सुशांतचं शेवटचं गाणं केवळ 11 लोकांनी पाहिलं? युट्यूबवरील VIEWS अचानक गायब

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चे टायटल ट्रॅक आज प्रदर्शित झाले आहे. दरम्यान हे गाणे प्रदर्शित होऊन एका तासाने युट्यूबवर या गाण्याला केवळ 11 Views दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चे टायटल ट्रॅक आज प्रदर्शित झाले आहे. दरम्यान हे गाणे प्रदर्शित होऊन एका तासाने युट्यूबवर या गाण्याला केवळ 11 Views दिसत होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कारण या गाण्यावर 2.7 लाख लाइक्स आहेत. दोन्ही आकड्यांमध्ये एवढी मोठी तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. यामध्ये काहीतरी तांत्रिक गडबड झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक किंवा फॉक्स स्टार (Fox Star) कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही आहे. काही वेळाने या व्हिडीओवर 4.9 लाखापेक्षा जास्त views दिसू लागले आहेत.

'दिल बेचारा' चित्रपटाचा ट्रेलर 06 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने लाखो views मिळवले होते. दरम्यान आज सुशांतच्या या शेवटच्या चित्रपटातील गाणं आज प्रदर्शित झाले आहे. 'दिल बेचारा' या सिनेमाचे ते टायटल ट्रॅक आहे. या गाण्याला काही तासातच कमालीचा रिस्पॉन्स त्याच्या चाहत्यांकडून मिळत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर देखील हे गाणे शेअर करण्यात आले आहे.

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर रेहमान यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून त्यांनीच हे गाणे गायले आहे. दरम्यान अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. एका कॉलेज फंक्शनमध्ये कमालीच्या एनर्जीने डान्स करताना सुशांत यामध्ये दिसत आहे. तर या गाण्याला असणारा 'रेहमान टच' नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) च्या दिल बेचारा या सिनेमाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सिनेमा 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ए आर रेहमानने संगीतबद्ध केलेले 'दिल बेचारा' हे चित्रपटातील गाणं आज प्रदर्शित झाले आहे. दिल बेचारा या सिनेमामध्ये सुशांतबरोबर 'संजना सांघी' (Sanjana Sanghi)  हा नवा चेहरा दिसणार आहे. दिग्दर्शक आणि कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा (Mukesh Chabra)  यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुशांतला 'काय पो छे' या चित्रपटात हिरो म्हणून संधी दिली होती, हा सुशांतचा पहिला चित्रपट. तर दिल बेचारा हा मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला सुशांतचा शेवटचा चित्रपट. 24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Hotstar ) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 10, 2020, 2:01 PM IST

ताज्या बातम्या