मुंबई, 31 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी शुक्रवारी वाईट बातमी समोर आली. सर्वांचा लाडका खेळाडू ऋषभ पंत चा अपघात झाला. क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कारचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला धडकली. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका गंभीर होता की यात पंतची कारदेखील जळून खाक झाली आहे. एकीकडे ऋषभ पंतच्या अपघातावर सगळेजण हळहळ व्यक्त करत आहेत तोच दुसरीकडे अभिनेत्री उर्वशी रौतेला ट्रोल होत आहे. ऋषभच्या अपघातानंतर अभिनेत्रीनं इन्स्टाला पोस्ट करत त्याच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं सांगितलं. आता अभिनेत्रीनं ऋषभ पंतसाठी आणखी एक ट्विट केलं आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्राम पोस्टनंतर ऋषभ पंतसाठी आणखी एक ट्विट केलं आहे. सध्या तिचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. काही क्षणातच उर्वशीचं हे ट्विट व्हायरल झालं. नव्या ट्विटमध्ये उर्वशी म्हणाली, ‘मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबाच्या कल्यासाठी प्रार्थना करते.’ या पहिलेही उर्वशीने ऋषभ पंतसाठी पोस्ट केली होती. ती पोस्टदेखील चांगलीच व्हायरल झाली होती.
I pray for you & your family’s wellbeing.
— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) December 30, 2022
ऋषभ पंतच्या अपघातानंतर काही वेळातच उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला. भीषण अपघातानंतर ती ऋषभ पंतला लवकर बरे होण्याचा संदेश देईल अशी अपेक्षा होती आणि तेच घडले. उर्वशीने स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, ‘प्रार्थना’.
दरम्यान, उत्तराखंडमधल्या रुरकीजवळ पहाटे 5.15 वाजता हा अपघात झाला आहे. पंतच्या डोक्याला आणि पाठीला प्रचंड दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर त्याला पुढील उपचारासाठी देहरादूनला हलवण्यात आलं आहे. त्याच्या अपघाचानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून चाहतेही सदम्यात आहेत. तो लवकर बरा व्हावा म्हणून सगळेजण प्रार्थना करत आहेत.