जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नानंतर दिया मिर्झाचं जुनं Tweet व्हायरल; सलमानबाबत केला होता मोठा खुलासा

लग्नानंतर दिया मिर्झाचं जुनं Tweet व्हायरल; सलमानबाबत केला होता मोठा खुलासा

लग्नानंतर दिया मिर्झाचं जुनं Tweet व्हायरल; सलमानबाबत केला होता मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं नुकतंच लग्न झालं आहे. सध्या तिचं एक जुनं ट्विट (Dia Mirza old tweet) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतं आहे. या ट्विटमध्ये तिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबाबत (Salman Khan) मोठा खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) अलीकडेचं उद्योजक वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) आपलं दुसरं लग्न केलं आहे. लग्नाच्या दीड महिन्यातच तिने बेबी बंप दाखवून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. यावेळी अनेक चाहत्यांसोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. अशातचं दिया मिर्झाचं एक जुनं ट्विट (Dia Mirza old tweet) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतं आहे. या ट्विटमध्ये तिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबाबत (Salman Khan) मोठा खुलासा केला होता. अभिनेत्रीने दिया मिर्झानं 2015 साली एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये तिने सलमान खानचे आभार मानले होते. खरंतर सलमान खान अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिच्या आईसाठी देवदूत ठरला होता. त्याने दिया मिर्झाच्या आईचा जीव वाचवला होता. याची माहिती दियाने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. तेचं ट्विट पुन्हा एकदा व्हायरल होतं आहे. बॉलिवूडचा दबंग खान बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करण्यासोबतच त्याच्या मदतीसाठीही ओळखला जातो. आतापर्यंत त्याने बॉलिवूडच्या अनेक गरजू कलाकारांना मदतीचा हात दिला आहे.

जाहिरात

खरंतर, 2015 साली एकेदिवशी दिया मिर्झाची आई अचानक बेशुद्ध झाली होती. त्यामुळे घाबरलेल्या दियाने सलमानला फोन करून मदतीसाठी बोलावलं. यावेळी सलमानही वेळात वेळ काढून लगेचच दियाच्या घरी दाखल झाला आणि त्याने दियाच्या आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, आणखी पंधरा मिनिटं उशीर झाला असता तर आम्ही तिला वाचवू शकलो नसतो. त्यामुळे दियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून  सलमान खानचे आभार मानले होते. यावेळी दियाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘हा तोच माणुस आहे, ज्याने माझ्या आईचे जीव वाचवले आहे. त्याचे उपकार कधीही विसरू शकत नाही. #SalmanKhan’ हे ही वाचा- Dia Mirza Pregnant : ती चर्चा खरी ठरली; लग्नानंतर दीड महिन्यांतच दिया मिर्झाने दाखवलं आपलं बेबी बम्प दियाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझ्या आईच्या आरोग्यामुळे मी खुप अडचणीत होते. त्यावेळी सलमानने मला खूप आधार दिला. त्याचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे मी त्याला प्रत्येक वेळी साथ देईल, मग कोणतीही अडचण असो. दरम्यानच्या काळात सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामुळे अडचणीत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात