मुंबई, 01 एप्रिल : अभिनेत्री दिया मिर्झाच्या (Dia Mirza Pregnant) घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. दिया मिर्झाने लग्नानंतर दीड महिन्यांतच गूड न्यूज दिली आहे. आपल्या चाहत्यांसह तिने आपला हा आनंद शेअर केला आहे. बेबी बम्पसह दियाने आपला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. दियाने 15 फेब्रुवारी, 2021 आपला खास मित्र आणि उद्योजक वैभव रेखीसोबत लग्न केलं. लग्नानंतर पहिल्यांदाच दिया दिसली तेव्हा तिचे फोटो पाहू ती प्रेग्नंट आहे की काय अशा चर्चांना उधाण आहे. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. दिया खरंच प्रेग्नंट आहे. तिने बेबी बम्पसह आपला फोटो शेअर केला आहे.
दिया आणि वैभव एकमेकांचे खास मित्र. त्यांच्या मैत्रीचं रूपांत प्रेमात झालं, अनेक वर्षे ते नात्यात होते. अखेर 15 फेब्रुवारी, 2021 मध्ये तिने लग्नगाठ बांधली. दियाचा लग्नसोहळाही चांगलाच चर्चेत होता. दियाच्या लग्नाच्या विधीही महिला पुजाऱ्यानं केल्या. याशिवाय तिचं कन्यादान आणि पाठवणी झाली नाही. यावरून तिच्यावर टीका होऊ लागली आणि तिला अनेकांनी प्रश्न विचारले. दियाने सोशल मीडियावर पोस्ट करत या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली होती. हे वाचा - 1 एप्रिलला मराठी अभिनेत्रीने दिली Good News! शेअर केला बेबी बम्पसह फोटो दिया आणि वैभव दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. दिया मिर्झाचा पहिला विवाह साहिल संघा (Sahil Sangha) यांच्याशी झाला होता. दिया आणि साहिल हे अनेक वर्षं एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. 18 ऑक्टोबर 2014 रोजी ते विवाहबद्ध झाले होते. ऑगस्ट 2019मध्ये त्या दोघांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. वेगळं झाल्यानंतरही आपल्यात कोणतीही कटुता नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तर वैभवने याआधी सुनैना हिच्याशी लग्न केलं होत. सुनैना ही एक योगा ट्रेनर आहे. या लग्नापासून या दोघांना एक मुलगी देखील आहे. हे वाचा - ‘थलैवी’साठी काहीही…; कंगना रणौत 24 तास उभी राहिली पाण्यात दिया सुरुवातीला जाहिरातींसाठी मॉडेलिंग करायची. अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये ती सहभागी झाली होती. 2000 साली मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हा किताब तिला मिळाला. त्यानंतर 2001मध्ये रहना है तेरे दिल में या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दियाने दम, दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दस, लगे रहो मुन्नाभाई, परिणिता, संजू आदी चित्रपटांत अभिनय केला आहे. काफीर या वेबसीरिजमध्येही ती होती. पर्यावरण आणि सामाजिक कार्यातही ती सक्रीय असते. संयुक्त राष्ट्रसंघानेही दियाला भारताची पर्यावरणविषयक गुडविल अॅम्बेसिडर म्हणून नेमलं आहे.