कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. देशभरातील हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. रुग्णालयातील उपचारच काय तर एक वेळचं अन्न खाण्यासाठी देखील काही जणांकडे पैसे उरलेले नाहीत.
2/ 8
अशा परिस्थितीत देशभरातील अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. काही आर्थिक मदत केली तर काहींनी घरगुती वस्तू पुरवल्या. काहींनी औषधांसाठी वगैरे मदत केली.
3/ 8
या मदत करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंग याचं नाव देखील जोडलं गेलं आहे. त्यानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तब्बल 10 हजार लोकांना अन्नदान केलं.
4/ 8
कोरोना असला तरी मिका सिंग वाढदिवस साजरा करणार आहे. पण हा वाढदिवस तो नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं साजरा करणार आहे. त्यानं कुठल्याही प्रकारची पार्टी वगैरे न करता गरीबांना अन्नदान केलं आहे.
5/ 8
मिका सिंग (Mika Singh) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. ‘मोज्जा ही मोज्जा’ या गाण्यामुळं लोकप्रिय झालेल्या मिकानं आपल्या अनोख्या आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान प्रस्थापित केले आहे.
6/ 8
आज मिकाचा वाढदिवस आहे. (Mika Singh birthday) 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
7/ 8
मिकासोबतच सनी लियोनी, काजल अग्रवाल, जेनेलिया देशमुख, राज कुंद्रा, नेहा भसीन, दिगंगना सूर्यवंशी, साध सय्यद, अनुष्का मंचंद या कलाकारांनी देखील या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं गरीबांना अन्नदान केलं होतं.
8/ 8
मिकासोबतच सनी लियोनी, काजल अग्रवाल, जेनेलिया देशमुख, राज कुंद्रा, नेहा भसीन, दिगंगना सूर्यवंशी, साध सय्यद, अनुष्का मंचंद या कलाकारांनी देखील या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं गरीबांना अन्नदान केलं होतं.