मुंबई, 18 जून : बाॅलिवूडची ड्रामा गर्ल आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant Latest News). ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. मीडियासमोर काहीही बरळत असते, त्यामुळे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल होत असलेले पाहायला मिळत असतात. अशातच राखी पून्हा एकदा व्हिडीओमुळे चर्चेचा विषय बनली आहे. राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान (Rakhi Sawant Boyfriend Name ) याच्यासोबत तिचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे. अशातच यात आणखी एक व्हिडीओची भर पडली आहे. समोर आलेल्या या व्हिडिओंमध्ये राखी आणि आदिलची (Rakhi’s boyfriend adil) जबरदस्त स्टाइल आणि जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. भररस्त्यात दोघांचा रोमॅन्स पहायला मिळत आहे. हे ही वाचा - प्रतीक्षा संपली! Taarak Mehta.. ला मिळाली नवी दयाबेन;‘ही’ अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा?
व्हिडीओमध्ये राखी छत्रीसोबत पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी वारा इतका जोराचा आहे की छत्री सांभाळताना राखीला स्वत:ला सांभाळता येत नाही आणि ती गाडीवर पडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे छत्रीही वळताना दिसत आहे. यासोबतच आदिल व्हिडीओमध्ये राखीला सांभाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. याशिवाय दोघे डान्सही करताना दिसत आहेत. यादरम्यान राखी आणि आदिल दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसतात. त्यांचा हा क्यूट आणि रोमॅन्टिक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हे ही वाचा - काश्मिरी पंडितांबाबत वक्तव्य करुन वादात अडकलेल्या साई पल्लवीला चित्रपट नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं काम
दरम्यान, बिग बाॅसमुळे राखी (Rakhi Sawant In Bigg Boss) चांगलीच प्रकाशझोतात आलेली पहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बाॅयफ्रेंड आदिल खान (Rakhi Sawant Boyfriend Name ) याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय. राखी सावंतचा घटस्फोट झालेला असतानाच तिच्या दुसऱ्या लग्नाच्याही चर्चा सुरु झालेल्या दिसत आहे. त्यामुळे आता हे नवं कपल पुढे जाऊन काय निर्णय घेणार हे पाहणं तितकंच उस्तुकतेचं ठरणार आहे. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.