मुंबई, 13 सप्टेंबर- मनोरंजनसृष्टीत लग्नसराई समाप्त होण्याचं नावच घेत नाहीय. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. सुरवातीला कतरिना कैफ विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर अंकिता लोखंडे विकी जैन, मौनी रॉय सुरज नांबियार, विक्रांत मेसी, फरहान अख्तर शिबानी दांडेकर त्यानंतर आलिया भट्ट रणबीर कपूर अशा कित्येक लोकप्रिय जोडप्यांनी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध जोडप्याच्या लग्नाचा बँडबाजा वाजणार आहे. बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हे जोडपं कधी, कुठे आणि कसं लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, रिचा आणि अली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत आणि या महिन्यात ते लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा विवाह दिल्ली-मुंबई या दोन्ही ठिकाणी साजरा होणार आहे. या जोडप्याचा लग्नसोहळा 30 सप्टेंबर रोजी दिल्लीत सुरु होईल आणि 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत संपेल. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचं लग्न मुंबईत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत एका खाजगी सोहळ्यात पार पडणार आहे. त्यानंतर दोघेही मुंबईत जवळच्या मित्रांसाठी आणि सेलिब्रेटींसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.दोघांच्या प्री-वेडिंग सेरेमनी 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ज्यामध्ये फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. लग्नाचे सर्व कार्यक्रम दिल्लीत होणार आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, दोघे 1 ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. **(हे वाचा:** Ali Fazal and Richa Chadha : ठरलं! रिचा चड्ढा आणि अली फजलचा होणार शाही विवाहसोहळा; वेडिंग प्लॅन आला समोर ) ETimes च्या वृत्तानुसार, लग्नाचे सर्व कार्यक्रम दिल्लीजवळील रॉयल हेरिटेज फोर्टमध्ये आयोजित केले जाणार आहेत. जे सलग तीन दिवस सुरु राहणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी सुरू झालेले कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी संपतील. रिचा आणि अली अनेक दिवसांपासून लग्नाची योजना आखत होते. पण कोरोनामुळे त्यांचं लग्न पुढे ढकललं जात होतं. हे दोघे ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर 2013 मध्ये भेटले होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये अलीने मालदीवमध्ये सुट्टीवर असताना रिचाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केलं होतं. आता हे दोघे लग्न करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.