आदित्य पांचोली मानहानी प्रकरणी कंगना आणि रंगोली यांना कोर्टाकडून समन्स

आदित्य पांचोली मानहानी प्रकरणी कंगना आणि रंगोली यांना कोर्टाकडून समन्स

Kangana Ranaut Aditya Pancholi Case अभिनेत्री कंगना रनौतनं आदित्य पंचोलीवर शारीरिक हिंसा आणि मारहाणीचा आरोप केला होता.

  • Share this:

मुंबई, 26 जून : आदित्य पांचोली आणि कंगना रणौत हा वाद आता कोणासाठी नवा राहिलेला नाही. पण मागच्या काही काळापासून हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता मुंबई न्यायालयाने आदित्य पांचोली मानहानी प्रकरणी कंगना रणौत आणि रंगोली चंडेल यांना समन्स बजावले आहेत. आदित्य पांचोलीच्या वकील श्रेया श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली, त्या म्हणाल्या, कंगना आणि रंगोली यांना एकूण चार समन्स देण्यात आले आहेत. पहिला आदित्य पांचोलीकडून कंगना रणौत तर दुसरा आदित्य पांचोलीकडून रंगोली चंडेल तसेच जरीना वहाबकडून कंगना रणौत आणि जरीना वहाबकडून रंगोली चंडेल असे एकूण चार समन्स दोन्ही बहीणींना बजावण्यात आले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 जुलैला होणार आहे. यावेळी कंगना आणि रंगोलीला न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे. कंगनानं आदित्य पांचोलीवर आरोप केल्यानंतर त्याची पत्नी जरीना वहाब आदित्यच्या मदतीला आली आहे. जरीना म्हणाली, ‘मी आदित्यला इतर कोणापेक्षा जास्त ओळखते. तो माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवत नाही. भूतकाळात काय झालं हे मला माहित आहे. त्याने कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही.’

Birthday Special : ...म्हणून अर्जुन कपूरच्या घरात एकही सिलिंग फॅन नाही

काय आहे संपूर्ण प्रकरण

अभिनेत्री कंगना रणौतनं आदित्य पांचोलीवर शारीरिक हिंसा आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर 2017मध्ये आदित्यने कंगनावर मानहानी केल्याची याचिका दाखल केली. याची सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यानं आता कंगना आणि रंगोलीला कोर्टानं समन्स बजावले आहेत. आदित्य पांचोलीनं काही दिवसांपूर्वीच कंगनाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

आदित्य पांचोली प्रकरणात साक्ष द्यायला पोलीस ठाण्यात पोहोचली कंगना रणौत

आदित्यचं नाव न घेता त्याच्यासोबतच्या नात्याबाबत कंगनानं काही खुलासे केले होते. ज्यात तिनं म्हटलं होतं, ‘आम्ही दोघंही नवरा-बायकोप्रमाणे राहत होतो. आमच्यासाठी आम्ही यारी रोडला एक घर घेण्याचा प्लानही केला होता. आम्ही दोघं एका मित्राच्या फ्लॅटवर 3 वर्ष राहिलो. मी जो फोन वापरायचे तो सुद्धा त्याचाच होता.’

बोटीवर प्रियांकाने निक जोनसला सर्वांसमोर केलं KISS, PHOTO VIRAL

कंगना पुढे म्हणाली, ‘तो माणूस माझ्या वडीलांच्या वयाचा होता. त्याने माझ्या डोक्यावर मारहाण केली होती. त्यावेळी माझं वय 17 वर्ष होतं. त्यानं केलेल्या मारहाणीनंतर माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर मी माझी सँडल त्याच्या डोक्यात मारली आणि त्यामुळे त्यालाही दुखापत झाली. त्यानंतर मी त्याच्या विरोधात FIR दाखल केली होती.’

==========================================================

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 01:12 PM IST

ताज्या बातम्या