आदित्य नारायणने श्वेताला लग्नातच केलं KISS; फोटो पाहताच नेहा कक्कर अशी झाली REACT

आदित्य नारायणने श्वेताला लग्नातच केलं KISS; फोटो पाहताच नेहा कक्कर अशी झाली REACT

आदित्य नारायण (aditya narayan) आणि नेहा कक्करचं (neha kakkar) लग्न होण्याआधी काही महिने त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगत होत्या. आता दोघांनीही आपला वेगळा लाइफ पार्टनर निवडला आहे. तरी नेहानं आदित्यचा हा लग्नाचा फोटो पाहिल्यानंतर ती स्वत:ला रोखू शकली नाही.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : अँकर आणि गायक आदित्य नारायणच्या (aditya narayan) लग्नानंतर आता पुन्हा एकदा आदित्य आणि नेहा कक्करच्या (neha kakkar) चर्चा परत  रंगू लागल्या आहेत. या चर्चेमागचं  कारण आहे आदित्यचा त्याच्या बायकोला किस (kiss) करतानाच फोटो. सोशल मीडियावर (social media)  वायरल होणाऱ्या या फोटोवर आता नेहा कक्करनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्यनं आपल्या लग्न  सोहळ्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. त्यापैकी एक श्वेता अग्रवालला (shweta agrawal) किस करतानाचा फोटो. आदित्य श्वेताला गालावर किस करताना दिसतो आहे.  सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या फोटोला हजारो लाइक्स आणि शेकडो कॉमेंट्स मिळाले. अगदी नेहा कक्करनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'फारच सुंदर ,खूप खुप शुभेच्छा' अशी कमेंट्स आदित्यच्या या फोटोवर नेहानं दिली आहे.

आदित्य नारायण रिअॅलिटी-शोचा (reality show) अँकर (anchor) म्हणून किंवा एक उत्तम  गायक म्हणून कायमचं चर्चेत असतो.  आदित्य नारायण  इंडियन आयडॉल (indian idol) या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक होता आणि नेहा कक्कर (neha kakkar) परीक्षक होती. त्यावेळी  नेहा आणि आदित्यचा फेक लग्न या शोमध्ये झालं होत. काही महिन्यांपूर्वीच आदित्य आणि नेहाची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर ट्रेंडिंग होती.

हे वाचा - Oh no! लग्न लागता लागता फाटला आदित्य नारायणचा पायजमा; नंतर काय झालं तुम्हीच वाचा

मागील महिन्यात नेहानं आपली साता जन्माची गाठ रोहनप्रीत सिंग (RohanPreet singh) बरोबर बांधली आणि आता आदित्य देखील त्याच्या लॉन्ग टाइम गर्लफ्रन्ड श्वेता अग्रवाल बरोबर लग्न बंधनात अडकला आहे. श्वेताने  2010 मध्ये आदित्य बरोबर शापित (shaapit) या चित्रपटात अभिनेत्री म्हणून  मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच आदित्य आणि श्वेताच्या प्रेमसामन्धाची चर्चा बॉलीवूड (bollywood) मध्ये होती परंतु आता तब्ब्ल 10 वर्षानंतर हे दोघेही लग्न बंधनात अडकले आहे. आदित्य आणि श्वेताचा लग्न सोहळा कोरोनाच्या (corona) पार्श्ववभूमीवर अवघ्या 50 वऱ्हाडांमध्ये  जुहूतील(juhu) इस्कॉन टेम्पल (iskcon temple) येथे  पार पडला. आदित्य -श्वेताच्या रिसेप्शनला  गोविंदा (govinda), भारती सिंग(bharti singh) , हर्ष लिंबाचींनी (harsh limbachin) आणि इतर मित्र परिवारानं हजेरी लावली होती.

हे वाचा - अभिनेत्री हिना खानचा रेड Bikini मधील हॉट लुक, Bold फोटोशूट सोशल मीडियावर हिट

आदित्य नारायण हा उदित नारायण (udit narayan)चा एकुलता एक मुलगा आहे . आदित्य अंधेरीत(andheri)  त्याच्या आई वडिलांबरोबर राहतो पण आता त्याने त्याच्या जुन्या घरा पासून  अगदी काही अंतरावरच 5bhk घर घेतलंय  आणि आता तो लवकरचं आपल्या गृहलक्ष्मी श्वेता बरोबर या  नवीन घरात प्रवेश करणार आहे,अशी माहिती देखील आदित्यने दिली आहे .

Published by: News18 Desk
First published: December 4, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading