Oh no! लग्न लागता लागता फाटला आदित्य नारायणचा पायजमा; नंतर काय झालं तुम्हीच वाचा

Oh no! लग्न लागता लागता फाटला आदित्य नारायणचा पायजमा; नंतर काय झालं तुम्हीच वाचा

स्वतःच्या लग्नातला प्रत्येक क्षण कायम लक्षात असतो पण आदित्य नारायणच्या (aditya narayan) लग्नात असं काही घडलं जे फक्त तोच नाही तर लग्नाला आलेले पाहुणेही कधीच विसरू शकणार नाहीत.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : प्रत्येकाच्या लग्नात (wedding) काही ना काही मजेशीर आणि कधीच विसरता येणार नाही असा किस्सा असतोच. अगदी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. नुकतंच अँकर (Anchor) आणि गायक (singer) आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (shweta agrawal) यांचा लग्नसोहळा पार पडला. ज्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या लग्नात एक असा किस्साही जो खुद्द आदित्यनंच सांगितला आहे.

लग्न लागत असतानाच आदित्यचा पायजमा फाटला होता. स्पॉटबॉय (spotboy) ला दिलेल्या मुलाखतीत आदित्यनं सांगितलं, श्वेताला तो वरमाला घालत असताना तिच्या भावांनी तिला उचललं. नंतर आदित्यच्या मित्रांनीदेखील आदित्यला उचललं. पण तेव्हाच आदित्यचा पायजमा फाटला. तो क्षण खरंच लाजिरवाणा होता पण तो कायमचं लक्षात राहिलं, असं आदित्यनं सांगितलं.

आदित्य नारायण हा उदित नारायण यांचा (udit narayan) एकुलता एक मुलगा आहे. रिअॅलिटी शोचा (Reality Show) अँकर म्हणून आणि एक गायक म्हणून तो कायमच चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वीच आदित्य आणि नेहा कक्कर(neha kakkar) ची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर ट्रेंडिंग होती. पण मागील महिन्यातच नेहानं आपली साता जन्माची गाठ रोहनप्रीत (rohanpreet) बरोबर बांधली  आणि आता आदित्य देखील त्याच्या लॉन्ग टाइम गर्लफ्रन्ड श्वेता अग्रवाल (shweta agrawal)  बरोबर लग्न बंधनात अडकला.

हे वाचा - VIDEO: कतरिना कैफ नाही तर तिच्या बहिणीवर फिदा झालाय सलमान खान

श्वेताने  2010 मध्ये आदित्यबरोबर शापित (shaapit) या चित्रपटात अभिनेत्री (acteress) म्हणून मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच आदित्य आणि श्वेताच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलीवूड (bollywood) मध्ये होती. आता तब्बल 10 वर्षांनंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. आदित्य आणि श्वेताचा लग्न सोहळा कोरोनाच्या (corona) काळातच पार पडला. फक्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत  जुहूतील (juhu) इस्कॉन टेम्पल (iskcon temple) इथं त्यांचं लग्न झालं. आदित्यनं आपल्या लग्नाचे फोटो सोशल मी़डियावर शेअर केले होते. आदित्य -श्वेताच्या रिसेप्शनला  गोविंदा (govinda), भारती सिंग (bharati singh), हर्ष लिंबाचींनी (harsh lambachini)आणि इतरही मित्र परिवारानंही हजेरी लावली होती.

हे वाचा - शेरास सव्वाशेर! सलग 2 दिवस कंगना रणौत - दिलजीत दोसांझचं TWEETER WAR

आदित्य अंधेरीत (andheri)  त्याच्या आई वडिलांबरोबर राहतो. पण आता त्याने त्याच्या जुन्या घरापासून अगदी काही अंतरावरच 5bhk घर घेतलं आहे आणि आता तो लवकरच श्वेताबरोबर या नवीन घरात प्रवेश करणार आहे, अशी माहिती देखील आदित्यनं दिली आहे. लग्न  तसेच रिसेपशन सोहळ्याचे फोटोग्राफ्स आदित्यने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 3, 2020, 10:47 PM IST

ताज्या बातम्या