जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aditi Deshpande: गेल्या वर्षभरापासून जिजी आक्का मालिकेच्या सेटवर राबवत आहेत हा उपक्रम, पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Aditi Deshpande: गेल्या वर्षभरापासून जिजी आक्का मालिकेच्या सेटवर राबवत आहेत हा उपक्रम, पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Aditi Deshpande: गेल्या वर्षभरापासून जिजी आक्का मालिकेच्या सेटवर राबवत आहेत हा उपक्रम, पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवर कलाकार गेल्या एक वर्षांपासून एक महत्त्वाचा उपक्रम राबवत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै: स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. टीआरपीमध्येही मालिका चांगल्या रँकमध्ये आहे. मालिकेतील सगळीच पात्र भन्नाट आहेत. प्रत्येक पात्राला त्याचा वेगळा टच आहे. ‘तुमची खरकटी आणि उचलायला मी एकटी’, हा फेसम डायलॉग रोज घरातील सर्वांना सुनावणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या जिजी आक्का देखील प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. मालिकेत अनेक कलाकारांची तगडी फौज आहे. त्यामुळे मालिकेवर कलाकारांची चांगलीच रेलचेल असते. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवर जिजी आक्कांनी पर्यावरण रक्षणाचा विडा उचलला आहे. जिजी आक्कांच्या या कार्यात मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांनीही त्यांनी साथ दिली आहे. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवर पर्यावरण रक्षणासाठी कलाकारांनी घेतला पुढाकार आहे.  जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर केला जात आहे. सेटवर दररोज पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या इतर कचरा एकत्र जमा करतात. हा प्लास्टिकचा कचरा अभिनेत्री अदिती दादरमधील गल्ली येथील ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात.

जाहिरात

दादर येथील ग्रीन इनिशिएटीव्ह ही संस्था प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती करत किंवा या बाटल्या बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. हेही वाचा - Supriya Sule In Bus bai Bus: घरात स्वयंपाक करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर, म्हणाल्या…

News18

निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी या कलाकारांनी मोठा पुढाकार घेतला आहे. मालिकेच्या सेटवर मागील एक वर्षापासून हा उपक्रम सातत्यानं सुरू आहे. मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटताना दिसत आहेत.  अभिनेत्री अदिती देशपांडेसह मालिकेच्या सेटवरील सर्वत्र लोकांचं या उपक्रमासाठी कौतुक करण्यात येत आहे.

News18

अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्याविषयी सांगायचं झालं तर अदिती या मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजनवरचा सर्वांचा ओळखीचा चेहरा आहे. त्यांनी या आधी अनेक मालिकांमध्ये सासूची भूमिका निभावली आहे. मात्र फुलाला सुगंध मातीचा मधील कीर्तीची सासू म्हणजेच जिजी अक्काची भूमिका चांगलीच गाजताना दिसत आहे.  प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या सूनबाई आहेत. अदिती यांचा ‘नॉट ओलनी मिसेस राऊत’ हा सिनेमा देखील त्यांचा चांगलाच गाजला होता. अदिती यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बेस्ट फिचर फिल्मनं गौरवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात