जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kriti Sanon: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढल्यामुळे चर्चेत आलेली 'आदिपुरुष'मधील सीता; ट्रोल होताच दिलं असं स्पष्टीकरण

Kriti Sanon: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढल्यामुळे चर्चेत आलेली 'आदिपुरुष'मधील सीता; ट्रोल होताच दिलं असं स्पष्टीकरण

 क्रिती सेनन

क्रिती सेनन

चित्रपटात जानकीची भूमिका साकारणारी क्रिती सेनन सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटामध्ये जानकीची सोज्वळ भूमिका साकारलेली क्रिती खासगी आयुष्यात मात्र,बिनधास्त आणि बोल्ड आहे. क्रितीनं एकदा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढली होती.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 17 जून :  अभिनेता प्रभास,सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर’आदिपुरुष’हा चित्रपट टीझर लाँचपासूनच जोरदार चर्चेत होता. काल (16जून) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटात हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप दिग्दर्शक आणि कलाकारांवर होत आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटावर बहुतांशी प्रेक्षकांनी टीका केली आहे. चित्रपटाची स्टार कास्टदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषत: चित्रपटात जानकीची भूमिका साकारणारी क्रिती सेनन सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटामध्ये जानकीची सोज्वळ भूमिका साकारलेली क्रिती खासगी आयुष्यात मात्र,बिनधास्त आणि बोल्ड आहे. क्रितीनं एकदा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढली होती. तिनं स्‍वत: स्‍मोकिंगचा अनुभवही शेअर केला होता.‘एबीपी’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आदिपुरुषमध्ये आपल्या साधेपणाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या क्रितीनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव स्टारर’बरेली की बर्फी’या चित्रपटात तिनं बिनधास्तमुलगी’बिट्टी’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात क्रिती सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसली होती. हा प्रकार पाहून चाहतेही थक्क झाले होते. खऱ्या आयुष्यातही क्रितीला सिगारेट ओढण्याचं व्यसन आहे,असं काहींना वाटू लागलं होतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘बरेली की बर्फी’चित्रपटातील या सीननंतर क्रिती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान तिला या सीनबाबत प्रश्नही विचारण्यात आला होता. ती म्हणाली होती, “मी स्मोकिंग करत नाही. माझा त्याला विरोध आहे,पण चित्रपटासाठी मला स्मोकिंग करावं लागलं. पहिल्यांदा स्मोकिंग करणं मला आवडलं नाही. मला फक्त माउथ फॉग करायचं नव्हतं. जे स्मोकिंग करतात त्यांना क्षणार्धात समजलं असेल की मी स्मोकर नाही.” ‘डायलॉग्ज टपोरी अन रावणाचा लूक…’ रामानंद सागर यांच्या मुलाने ओम राउतवर केली जहरी टिका 2014मध्ये’हिरोपंती’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रितीनं आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक चांगले चित्रपट दिले आहेत. पण,सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा तिनं पहिल्यांदा रॅम्प वॉक केला होता तेव्हा ती रडली होती. तिच्या पहिल्या रॅम्प वॉकदरम्यान,तिच्याकडून चूक झाली होती. ज्यामुळे तिला कोरिओग्राफरच्या रागाचा सामना करावा लागला होता. जवळपास इतर20मॉडेल्ससमोर क्रितीला ओरडा बसला होता. यानंतर क्रिती नाराज झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. दरम्यान, ‘आदिपुरुष’हा भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वांत महागडा चित्रपट आहे. त्याचं बजेट जवळपास500कोटी रुपये आहे. पण,पहिला टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला टीकेला सामोरे जावं लागत आहे. चित्रपटातील संवाद,व्हीएफएक्स आणि कथा इत्यादींमुळे चित्रपट सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात