मुंबई, 6 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या बराच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता हृतिक रोशनसोबत ‘विक्रम वेधा’ मध्ये झळकला होता. त्यानंतर आता सैफ अली खान आपल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. प्रभास, क्रिती सेनन स्टारर या चित्रपटात सैफ लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेवरुन सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे. अभिनेता सैफ अली खानचा लुक कोणत्याही बाजूने रावणासारखा दिसत नसल्याची टीका त्याच्यावर केली जात आहे. या लुकवरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे.दरम्यान आता सैफ अली खानने आपल्या ड्रीम रोलबाबत खुलासा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. या बिग बजेट चित्रपटासाठी चाहते आतुर होते. नुकतंच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. परंतु या टीजरने अनेक चाहत्यांचा हिरमोड केला आहे. या चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामची भूमिका साकारत आहे. क्रिती सेनन सीतेची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु या चित्रपटात लंकेशला एका वेगळ्या अंदाजात सादर करण्यात आलं आहे. परंतु या लुकवरुन खळबळ माजली आहे. लोकांनी या चित्रपटाला विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रिलीजपूर्वीच चित्रपट वादात अडकताना दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटातील कलाकार चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. ‘बॉलिवूड बबल’शी बोलताना सैफ अली खानने त्याच्या ड्रीम रोलबद्दल सांगितलं आहे. सैफने सांगितलं की, ‘मला महाभारतात काम करायला आवडेल. परंतु कोणी त्याला ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’सारखं बनवलं तर. यामुलाखतीमुळे सैफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानला मुलाखतीदरम्यान जेव्हा त्याच्या ड्रीम रोलबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सैफने हा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना सैफने म्हटलं की, ‘मी असा विचार नाही करत. जे माझ्या समोर ठेवलं जातं मी त्याचा विचार करतो. खरं सांगायचं झालं, तर माझा असा कोणातच ड्रीम रोल नाहीय. मला नाही वाटत की याबाबत विचार करुन काही फायदा आहे. परंतु तरीसुद्धा मला काही वाटत असेल, तर मला महाभारतात काम करायचं आहे. पण त्याला कोणीतरी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’सारखं बनवायला हवं’. **(हे वाचा:** Sunny Singh B’day: बालपणी प्रसिद्ध मालिकेत झळकला होता सनी; ‘आदिपुरुष’ फेम लक्ष्मणाबाबत ‘या’ गोष्टी माहितीयेत का? ) ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. नुकतंच ‘आदिपुरुष’ चा टीजर रिलीज झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हिएफेक्सची प्रचंड खिल्ली उडवण्यात येत आहे. तसेच चित्रपटातील व्यक्तीरेखांच्या लुक्सवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. या चित्रपटात साऊथ स्टार प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे यांसारखी तगडी स्टार कास्ट आहे.