जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sunny Singh B'day: बालपणी प्रसिद्ध मालिकेत झळकला होता सनी; 'आदिपुरुष' फेम लक्ष्मणाबाबत 'या' गोष्टी माहितीयेत का?

Sunny Singh B'day: बालपणी प्रसिद्ध मालिकेत झळकला होता सनी; 'आदिपुरुष' फेम लक्ष्मणाबाबत 'या' गोष्टी माहितीयेत का?

सनी- प्रभास

सनी- प्रभास

बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे त्यातील कलाकारसुद्धा प्रचंड चर्चेत आले आहेत. या चित्रपटात प्रभासचा धाकटा भाऊ अर्थातच लक्ष्मणची भूमिका साकारुन अभिनेता सनी सिंगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 ऑक्टोबर-   बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे त्यातील कलाकारसुद्धा प्रचंड चर्चेत आले आहेत. या चित्रपटात प्रभासचा धाकटा भाऊ अर्थातच लक्ष्मणची भूमिका साकारुन अभिनेता सनी सिंगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेता सनी सिंग आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘देख भाई देख’ या मालिकेतून एक बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सनी सिंगने आज बॉलिवूडमध्ये खास ओळख बनवली आहे. पाहूया त्याच्याबाबत काही खास गोष्टी. हॅन्ड्सम हंक सनी सिंगचा जन्म 6 ऑक्टोबर 1985 रोजी दिल्लीत झाला होता. सनी सिंगने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. तो एक बालकलाकार म्हणून पहिल्यांदा पडद्यावर झळकला होता. 1995 मध्ये डीडी नॅशनलवर आलेल्या ‘देख भाई देख’ या लोकप्रिय मालिकेतील एका छोट्या भूमिकेतून सनीने आपली छाप पाडली होती. आता सनी सिंग ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासचा धाकटा भाऊ लक्ष्मणची भूमिका साकारताना दिसणार आहे.या चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता सनी सिंगने प्रचंड मेहनत घेऊन सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवलं आहे. 2018 मध्ये आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटात सनी सिंगची भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती. यामध्ये तो कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचासोबत झळकला होता. चित्रपटात कार्तिकसोबत त्याचं बॉन्डिंग लोकांना भावलं होतं. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. सनी सिंगने ‘पाठशाला’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. यानंतर तो ‘दिल तो बच्चा है जी’मध्येही दिसला होता. सनी सिंगला आपली ओळख निर्माण करण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला. 2013 मध्ये आलेल्या ‘आकाश वाणी’ चित्रपटात सनी सिंगने एक भूमिका साकारली होती. परंतु या चित्रपटातूनही त्याला हवी ती ओळख मिळू शकली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

सनी सिंगला 2015 मध्ये आलेल्या ‘प्यार का पंचनामा 2’ मधून चांगली ओळख मिळाली होती. या चित्रपटातील सनी सिंगच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती. यानंतर सनीने ‘दे दे प्यार दे’, ‘झूठा कहीं का’, ‘उजडा चमन’, ‘पति पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सनीला खरी ओळख ‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने चांगला व्यवसाय तर केलाच शिवाय सनीच्या पात्रालाही खूप प्रेम मिळालं होतं. याच चित्रपटातून कार्तिक आर्यनलासुद्धा नवी ओळख मिळाली होती. **(हे वाचा:** Adipurush साठी प्रभास ते सैफ अली खानने घेतलीय इतकी रक्कम; रिलीजपूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ) ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सनी सिंगच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट ठरेल अशी या अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत. या चित्रपटात सनी प्रभासचा धाकटा भाऊ लक्ष्मणची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. परंतु हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात