साऊथ सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे.
प्रेक्षकांनी चित्रपटाच्या व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या लुकवर प्रश्न उपस्थित केले असतानाच अनेक राजकीय संघटनाही चित्रपटाच्या विरोधात समोर आल्या आहेत.
त्यामुळे प्रभासचा बहुचर्चित चित्रपट 'आदिपुरुष' रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसून येत आहे.
दरम्यान या चित्रपटाचे कलाकार आता चर्चेत आले आहेत. या कलाकारांनी चित्रपटासाठी अफाट मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. पाहूया कोणी किती रक्कम घेतलीय.
अभिनेता प्रभासने या चित्रपटात प्रभू श्रीरामची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने त्याने जवळजवळ 100 ते 150कोटी रुपये घेतल्याचं आज तकच्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.
चित्रपटात लंकेशची भूमिका साकारुन वादात आलेल्या सैफ अली खानने चित्रपटासाठी 12 कोटी रुपये घेतले आहेत.
तर अभिनेत्री क्रिती सेनने याचित्रपटात सीतेची भूमिका साकारली आहे. यासाठी तिने केवळ 3 कोटी रुपये घेतले आहेत.