मुंबई, 20 जून : 16 जून रोजी प्रभासचा आदिपुरुष चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. प्रभास, क्रिती सेनन अशी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट काही दिवसांतच बंपर कमाईचा विक्रम मोडेल अशी पूर्ण आशा निर्मात्यांना होती. पण त्यांच्या या आशेवर पाणी फेरल गेलं. या चित्रपटावरून देशभर वाद सुरू आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, सोमवार आणि मंगळवारच्या आकडेवारीने निराशा केली आहे. रिलीजच्या दिवशीच प्रेक्षकांकडून चित्रपटाला तुफान ट्रोल केलं गेलं. एवढेच नाही तर देशभरातील साधू-पुजाऱ्यांनी देखील चित्रपटाला विरोध केला. आता आदिपुरुष बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तर शेजारच्या नेपाळच्या काठमांडूमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व पाहून ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबवावे आणि चित्रपटगृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटावर भविष्यात बंदी घालण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. या पत्रात लिहिले आहे की, ‘दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मंतशिर शुक्ला आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची गरज आहे.’ या पत्रावर कारवाई झाल्यास भारतातही या चित्रपटावर बंदी येऊ शकते.b
All India Cine Workers Association write to Prime Minister Narendra Modi, requesting him to "stop screening the movie and immediately order a ban of #Adipurush screening in the theatres and OTT platforms in the future.
— ANI (@ANI) June 20, 2023
"We need FIR against Director Om Raut, dialogue writer… pic.twitter.com/jYq3yfv05c
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याने आता या चित्रपटावर खरंच काही कारवाई होणार का ते पाहणं महत्वाचं आहे. चित्रपटाला एवढा विरोध होत असताना दुसरीकडे सिनेमाचे कलाकार बॉक्स ऑफिसवरील यशाचा आनंद घेत आहेत. चित्रपटावर देशात बंदी घालण्याची मागणी होत असताना काल क्रिती सेननने चित्रपटगृहातील काही व्हिडीओ पोस्ट करत ‘फक्त टाळ्या आणि शुभेच्छांवर लक्ष देत आहे’ अशी क्रिप्टीक पोस्ट केली होती. रामायणातील रावणाने मागितलेली प्रेक्षकांची माफी; त्या गोष्टीबद्दल शेवट्पर्यंत प्रायश्चित्त करत राहिला अभिनेता आदिपुरुषबाबत सुरू असलेल्या गदारोळात निर्मात्यांनी मोठे पाऊल उचलले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांत निर्मात्यांनी चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, संवादांचे पुनर्लेखन आणि वाचन करण्याचे कामही सुरू झाले आहे. 3 दिवसात नवीन डायलॉग्स असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
लेखक मनोज मुंतशीर यांना चित्रपटातील संवादांमुळे सतत ट्रोल केले जात आहे. मनोजने सोशल मीडियावर पोस्ट आणि मुलाखतीद्वारे स्पष्टीकरणही दिले आहे, पण लोकांचा रोष कमी होत नाहीये. या सगळ्यात मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे स्वत:साठी सुरक्षा मागितली होती आणि पोलिसांनीही त्यांना सुरक्षा पुरवली आहे.