जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Adinath Kothare: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या सिरीजमध्ये झळकणार दौलतराव; 'या' फेमस प्रोजेक्टमध्ये आदिनाथची वर्णी

Adinath Kothare: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या सिरीजमध्ये झळकणार दौलतराव; 'या' फेमस प्रोजेक्टमध्ये आदिनाथची वर्णी

Adinath Kothare: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या सिरीजमध्ये झळकणार दौलतराव; 'या' फेमस प्रोजेक्टमध्ये आदिनाथची वर्णी

चंद्रमुखी सिनेमाच्या यशानंतर आता आदिनाथ कोठारे हा अभिनेता येत्या काळात एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 03 ऑगस्ट: अभिनेता आदिनाथ कोठारे चंद्रमुखी सिनेमानंतर बराच चर्चेत येताना दिसत आहे. मागच्या अनेक वर्षात आदिनाथ खूप चांगल्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहे. येत्या काळात आदिनाथ एका प्रसिद्ध वेबसिरीजचा भाग होताना दिसणार आहे. आणि एवढंच नाही तर या सिरीजमध्ये आदिनाथ बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीसोबत झळकताना दिसणार आहे. आदिनाथची वर्णी ‘क्रिमिनल जस्टीस’ (adinath kothare in criminal justice) या प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये लागली असून त्याची दमदार झलक नुकतीच समोर आली आहे. आदिनाथच्या भूमिकेवर अजून प्रकाश टाकण्यात आला नसला तरी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये मराठी चेहरा झळकताना दिसणार आहे. क्रिमिनल जस्टीसमध्ये पंकज त्रिपाठी हे वकिलाची भूमिका साकारत असून येत्या काळात त्यांच्या करिअरमधली सगळ्यात कठीण केस त्यांना सोडवावी लागणार असं या टीझरमध्ये बघायला मिळत आहे. याआधीच्या सिझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर येत्या सीझनमध्ये असलेलं गूढ आणि रहस्य बरंच गहिरं होत जाणार यामध्ये शंका नाही. टीझरवरून तरी सिरीजबद्दल बरीच उत्सुकता दिसून येत आहे. हे ही वाचा-  Teja Deokar: सिनेसृष्टीपासून दूर मात्र फोटो एक नंबर; ‘कुलस्वामिनी’ फेम अभिनेत्री झालीये बंगाली ब्युटी आदिनाथच्या वर्क फ्रंटवर सांगायचं तर दौलतराव या भूमिकेने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. चंद्रमुखी आणि दौलत यांच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याचं दिसून आलं होतं. तसंच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर लक्षणीय कामगिरी केल्याचंही बघायला मिळालं होतं. तसंच आदिनाथने मागच्या काळात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुद्धा हजेरी लावली होती. त्याने दिग्दर्शित केलेला पाणी हा सिनेमा सुद्धा नेमका कधी रिलीज होणार याची उत्सुकता बघायला मिळत आहे.

जाहिरात

सध्या अनेक मराठी कलाकार हे अनेक हिंदी प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसत आहेत. क्षिती जोग ही अभिनेत्री धर्मा प्रॉडक्शनच्या रॉकी और रानी की प्रेमकहानी सिनेमात झळकताना दिसणार आहे. तर संतोष जुवेकर आणि अजित केळकर हे कलाकार आलिया भट्टच्या डार्लिंग्ज सिनेमात दिसणार आहेत. आदिनाथ सुद्धा एका मोठ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याने एक अभिमानाची गोष्ट म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात