मुंबई, 22 जून : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होते. शेवटी आज
(Chief Minister Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची
(Chief Minister Uddhav Thackeray resigns) घोषणा केली. हे वृत्त अनेकांना धक्का देणारं आहे. यात मोठं नुकसान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
(Urmila Matondkar) यांचं देखील झालं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
"गुळाच्या ढेपेला मुंगळा चिटकून बसतो, तसा मी चिटकून बसणारा नाही. मी गेल्या बुधवारीच वर्षा निवासस्थान सोडून माझ्या मातोश्री निवासस्थानी आलो. मी आज आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. ठिक आहे, मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कुणी असतील त्यांना होऊद्या. मी होणार नाही. म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर केलं.
Big News : महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर हादरा! ठाकरे सरकार कोसळलं, अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नुकसान
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घोषणा करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला. राज्यपालांनी ज्या पद्धतीने 24 तासांत फ्लोर टेस्टची मागणी केली. याबद्दल त्यांचा आदर वाटतो. गेल्या वर्षभरापासून आम्ही बारा लोकांची यादी पाठवली, त्यावरही अशीच कारवाई करावी. काही महिन्यांपूर्वी फडणवीस यांच्या ट्विटवर उर्मिला मातोंडकर यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित केला, जे राज्यपाल कार्यालयात एका वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहे. कारण, महाराष्ट्र सरकारने विधान परिषदेवर नियुक्तीसाठी पाठवलेल्या नावांवर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातील एक नाव उर्मिला यांचे देखील आहे. राज्यपाल सरकारच्या शिफारशीवर कोणताही निर्णय घेत नाहीत हे देखील अलोकतांत्रिक असल्याची आठवण उर्मिला यांनी फडणवीस यांना करून दिली होती. अगोदर काँग्रेसकडून खासदारकीला पराभव झाल्यानंतर उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, याठिकाणीही राज्यपालांनी नियुक्ती केली नसल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.