Home /News /entertainment /

फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणनं मारले 6 बोटांवर पुलअप्स; पाहा अभिनेत्याचा थक्क करणारा वर्कआउट

फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणनं मारले 6 बोटांवर पुलअप्स; पाहा अभिनेत्याचा थक्क करणारा वर्कआउट

त्यानं एक पुलअप्स मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (six finger pull ups) लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये तो केवळ सहा बोटांच्या आधारावर व्यायाम करताना दिसत आहे. (viral video)

    मुंबई 14 मे: अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हा वयाच्या 55 व्या वर्षी देखील फिट अँड फाईन आहे. एकाद्या 25 वर्षांच्या तरुणाला त्याच्याकडे पाहून लाज वाटेल असं दमदार शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. अन् त्याच्या या सुदृढ शरीराचं संपूर्ण श्रेय जातं त्याच्या नियमित व्यायामाला. अलिकडेच त्याला कोरोनाची लागण झाली होती. परंतु काही दिवसांतच त्यानं कोरोनावर मात केली अन् आता पुन्हा एकदा तो नियमित व्यायाम करु लागला आहे. नुकताच त्यानं एक पुलअप्स मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (six finger pull ups) लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये तो केवळ सहा बोटांच्या आधारावर व्यायाम करताना दिसत आहे. (viral video) मिलिंदची ही फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो पुलअप्स कसे मारायचे? आणि कसे मारायचे नाहीत? याबद्दल मार्गदर्शन करत आहे. शिवाय व्हिडीओच्या शेवटी त्यानं केवळ सहा बोटांवर पुलअप्स मारुन दाखवले आहेत. खरं तर पुलअप्स हा अत्यंत कठीण प्रकार आहे. यामध्ये केवळ हाताच्या आधारावर संपूर्ण शरीराचं वजन उचलावं लागतं. हा व्यायाम करताना शरीराचं संतुलन असणं गरजेचं आहे. अन्यथा हात किंवा पाठ लचकू शकते. परंतु मिलिंद दररोज न चूकता हा व्यायाम करतो त्यामुळं आता तो अगदी पटाईत झाला आहे. अन् तुम्हाला देखील अशी फिटनेस हवी असेल तर दररोज व्यायाम करा असा सल्ला त्यानं या व्हिडीओद्वारे चाहत्यांना दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी केली कमाल; तक्रार करताच ‘मुलगी झाली हो’मधील अभिनेत्याला लुटणारा गजाआड
    याव्यतिरीक्त त्यानं आणखी एक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना जागरूक केलंय आणि याची बरीच चर्चाही झाली होती. “काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचं करोनामुळे निधन झालं. त्याचं वय ४० इतकं होतं… त्याचं जाणं हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं…खूप लोकांनी मला विचारलं की, तु स्वतःला इतकं फिट ठेवतोस. मग तुला कसा करोना झाला…? पण माझं असं मत आहे की, जर तुमचं फिटनेस आणि आरोग्य उत्तम असलं तर करोनाशी सामना करण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते…पण ते तुम्हाला लागण होण्यापासून थांबवू शकत नाही.”, असं या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Milind soman, Shocking video viral

    पुढील बातम्या