मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Janmashtami 2022: 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल परीचा क्युट VIDEO पाहिला का?, दिसतेय फारच गोंडस

Janmashtami 2022: 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल परीचा क्युट VIDEO पाहिला का?, दिसतेय फारच गोंडस

myra vaikul

myra vaikul

गोकुळाष्टमीचं औचित्य साधत लाडक्या परीनं म्हणजेच मायरा वैकुळनं (Myra Vaikul) एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. पाहा VIDEO

  मुंबई, 18 ऑगस्ट : आज 'कृष्ण जन्माष्टमी' असून सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. हिंदू धर्मीय हा सण गोकुळाष्टमी म्हणून देखील साजरा करतात. कृष्ण जन्माष्टमीला रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा केला जातो. त्यामुळे आज जल्लोषाचं वातावरण असून सगळेजण निरनिराळ्या प्रकारे 'कृष्ण जन्माष्टमी' च्या शुभेच्छा देत आहेत. अशातच गोकुळाष्टमीचं औचित्य साधत लाडक्या परीनं म्हणजेच मायरा वैकुळनं (Myra Vaikul) एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ कायम चर्चेत असते. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि निरागसतेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच मायरानं 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कृष्णाच्या मृर्तीसमोर बसली असून कृष्णाला काहीतरी भरवत असल्याचं दिसत आहे. तिचा क्युट अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हेही वाचा -  Gokulashtmi Whatsapp Status : गोकुळाष्टमीनिमित्त तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश, सर्वांनाच आवडतील मायराच्या 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. याशिवाय या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस होताना दिसतोय. मायराचा हा व्हिडीओ अगदी काही वेळातच सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतोय. मायरानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'कृष्ण जन्मला गं बाई कृष्ण जन्मला' म्हणत मायरानं हा व्हिडीओ शेअर केलाय.
  मायराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. ती वेगेवेगळ्या थीमवर फोटो, व्हिडीओ बनवते. तिच्या आईवडिलांसोबतही ती ट्विनिंग कपडे घालून फोटोशूट करते. मायराच्या हस्यानं ती चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडते त्यामुळे अगदी लहानग्या वयात तीनं मोठं नाव कमावलं आहे. दरम्यान, 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi tuzhi reshimgath) ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना भरभरुन प्रेम मिळत असतं. या मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ (Mayra vaikul) तर सगळ्यांची आवडती बनली आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या