• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • डाएटमुळे परिस्थिती बिकट, मॅगीच्या वासावर मानावं लागतंय समाधान; सनी लियोनीचा VIDEO VIRAL

डाएटमुळे परिस्थिती बिकट, मॅगीच्या वासावर मानावं लागतंय समाधान; सनी लियोनीचा VIDEO VIRAL

मॅगी मुळे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) नाराज झाली आहे. सनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया (social media) वर चर्चेचा विषय ठरत आहे.

 • Share this:
  मुंबई 8 मे :  मॅगी ही अशी गोष्ट आहे जी लहानग्यांपासून थोरांपर्यत सगळ्यांनाच आवडते. तर कधीही आणि कोठेही झटपट बनवून खाण्यासारखा तो पदार्थ आहे. पण याच मॅगीमुळे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) नाराज झाली आहे. सनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया (social media)  वर चर्चेचा विषय ठरत आहे. सनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिच्या समोर मॅगी ठेवलेली आहे. तर सनी त्या मॅगीकडे एकटक पाहत आहे. पण ती मॅगी खाऊ शकत नाही. तर फक्त वास घेऊ शकते. तर व्हिडीओत तिला कोणीतरी सांगत आहे की डायच वर असताना केवळ मॅगीचा वास घेऊ शकतेस ती खाऊ शकत नाहीस. त्यामुळे सनी मात्र उदास होते. सनीचा हा व्हिडीओ आणि तिचे एक्सप्रेशन्स चाहत्यांना फारच आवडले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  सनीच्या या मॅगी व्हिडीओची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. सनी ध्या चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर मात्र फारच सक्रिय असते. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.
  View this post on Instagram

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  अनेकदा सनी अनेक फनी व्हिडीओज (funny videos)  सुद्धा बनवते जे तिच्या चाहत्यांना फार आवडतात. सनी तिचा रियॅलिटी शो स्प्लिट्सविला (Splitsvilla) साठी शुटींग करत होती. त्यामुळे ती काही दिवस केरळ , मुंबई असा प्रवासही करत होती. केरळ ट्रिपचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

  ‘सगळे पुरुष सारखेच असतात’; पत्नीनं सांगितली शाहिद कपूरची वाईट सवय

  सनी एम टिव्ही (MTV) वरील रियॅलिटी शो व्यतिरिक्त लवकरच ‘शेरो’ (Shero)  या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तब्बल चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिझर लाँच झाला होता.
  Published by:News Digital
  First published: