मुंबई 7 मे : अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajpoot) ही चित्रपटसृष्टीपासून कोसो दूर असली तरीही कायमच चर्चेत असते. मीरा आणि शाहीद हे बॉलिवूड (Bollywood) मधील एक प्रसिद्ध कपल आहे. अभिनेत्री नसली तरीही मीराची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे. आता तिने चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. व त्यातून तिने शाहीदची एक वाईट सवय ही सांगितली आहे.
सध्या लॉकडाउनमुळे शुटींग ठप्प आहे. तेव्हा अभिनेता शाहीद कपूर देखिल घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. (Mira Rajpoot shared shahids bad habbit)
View this post on Instagram
तर त्याची पत्नी मीरा ने सोशल मीडिया वर एक फोटो पोस्ट करत शाहीदची जणू तक्रारच केली आहे. या फोटोत दोन बूट दिसत आहेत. तर दोन मोजेही आहेत पण हे मोजे आणि बूट अस्थाव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे मीराने त्याचा फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलं आहे. त्यात ती म्हणते, ‘सगळे पुरुष असेच असतात का?’
पतीला निरोप देताना अभिनेत्री झाली भावूक; दिव्यांकाला एअरपोर्टवरच कोसळलं रडू
मीरा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नेहमीच फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. तर ती आपल्या कुटुंबासोबत , मुलांसोबत जास्तीत जास्त वोळ घालवताना दिसते. मुलगी मीशा (Meesha Kapoor) आणि मुलगा झेन (Zain Kapoor) यांचे फोटो ती शोशल मीडिया वर शेअर करत असते.
View this post on Instagram
नुकतच मीराने कोरोनापिडीतांसाठी (Corona) एक मोहीम सुरू केली आहे. ज्यातर्फे ती कोरोनाबाधीतांना मदत करण्यासाठी फंड जमा करत आहे. शाहीद आणि मीरा हे कपल नेहमीच चर्चेत राहणारं कपल आहे. मीरा आणि शाहीद ने 2015 मध्ये विवाह केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Shahid kapoor, Shahid Kapoor-Mira Rajput