Home /News /entertainment /

शबाना आझमींना ऑनलाइन दारू विकणाऱ्या कंपनीने घातला गंडा; पैसे देऊनही डिलिव्हरी नाहीच

शबाना आझमींना ऑनलाइन दारू विकणाऱ्या कंपनीने घातला गंडा; पैसे देऊनही डिलिव्हरी नाहीच

अभिनेत्री शबाना आझमी यांना मद्यविक्री कंपनीने मोठा गंडा घातला आहे. याविरोधात अभिनेत्रीने आवाज उठवला आहे.

  मुंबई 24 जून : लॉकडाउन (Lockdown) नंतर अनेक व्यावसायांमध्ये ऑनलाइन विक्री (Online selling) सुरू झाली. त्यातच मद्य विक्रिही (alcohol) ऑनलाइन सुरू करण्यात आली. पण आता यामध्ये ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचं समोर येत आहे. ज्येष्ट अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azami) यांनाही असाच अनुभव आला आहे. एका कंपनीने त्यांची फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आझमी यांनी ट्वीट करत आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये लिहिलं आहे. ‘सावध राहा. माझ्यासोबत फसवणूक झाली आहे. लिव्हिंग लिक्वीड्सकडून ऑर्डर करताना पैसे पे केले पण मागवलेल्या वस्तू आल्याचं नाहीत. ते माझे फोन कॉल्सही उचलत नाहीत.’ याशिवाय त्यांनी पुढे अकाउंट नंबरही दिला आहे. कंपनीचं नाव आणि ट्रान्झॅक्शन मोड सगळं काही दिलं आहे. व या मद्यविक्री कपंनीविरोधात तक्रार केली आहे. पण त्यांनी किती रक्कम पे केली होती. हे मात्र सांगितलेलं नाही.

  ‘या’ कारणाने मोडलं होतं अभिषेक- करिश्माचं ठरलेलं लग्न; या जोडीची आजही होते चर्चा

  याआधीही काही सेलिब्रिटींनी या ऑनलाइन मद्यविक्रीच्या फ्रॉड (Fraud) बाबत आवाज उठवला होता. अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri), अक्षय खन्ना (Akshay Khanna), करणसिंग ग्रोव्हर (karan Singh Grover) या सेलिब्रटींनी या फसवणूकीविरोधात आवाज उठवला होता. तर आता 70 वर्षीय शाबाना आझमींनाही हा अनुभव आला आहे. लिव्हिंग लिक्विड्स (Living liquids) असं या मद्यविक्रि कंपनीचं नाव आझमी यांनी सांगितलं आहे. लॉकडाउन नंतर अनेक व्यवसायांमध्ये बदल घडून आले. भाजी पासून ते मद्यापर्यत अनेक गोष्टी ऑनलाइनच मिळू लागल्या. पण ग्राहकांची अशाप्रकारे लूट होत असेल तर याविरोधात आवाज हा उठवलाच पाहिजे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Shabana Azami

  पुढील बातम्या