याचं मुख्य कारण त्यावेळी कधीच समोर येत नव्हतं. 2002 साली हे लग्न ठरंल होतं. पण हे लग्न मोडण्यामागे करिश्माची आई बबिता कपूर (Babita Kapoor) या असल्याचं समोर येत होतं. अभिषेक आणि करिश्माविषयी देखील अनेक बातम्या समोर येत होत्या. पण बबिता यांना कुठेतरी हे लग्न खटकत होतं. त्यांनी बच्चन कुटुंबासमोर काही प्रस्तावही ठेवले होते.View this post on Instagram
त्यावेळी करिश्माने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण अभिषेकने मात्र नुकतीच सुरुवात केली होती. तर अभिषेकचं करिअरही सेट झालं नव्हतं. याशिवाय एक काळ असाही होता जेव्हा बच्चन कुटुंबाला आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे बबिता यांनी बच्चन कुटुंबासमोर काही अटी ठेवल्या. त्यांनी बच्चन कुटुंबातील अभिषेकचा प्रॉपर्टीतील हिस्सा समोर ठेवायाला सांगीतला. मात्र बच्चन कुटुंबाला हे मान्य नव्हतं. आणि त्यानंतर हे लग्नं मोडलं.View this post on Instagram
'खतरोंके खिलाडी' नंतर दिव्यांकाचा पुन्हा एकदा सोज्वळ सूनेचा अवतार; चाहत्यांनी केलं कौतुक
करिष्माचं 2003 साली उद्योजक संजय कपूर याच्याशी लग्न झालं होतं. मात्र त्यांनी 2014 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर अभिषेकने 2007 साली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachhan) सोबत विवाह केला.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Entertainment