मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ब्रेकअपनंतर सर्वांसमोर स्टेजवर ढसाढसा रडली अभिनेत्री, सोशल मीडियावर Video Viral

ब्रेकअपनंतर सर्वांसमोर स्टेजवर ढसाढसा रडली अभिनेत्री, सोशल मीडियावर Video Viral

ही अभिनेत्री एका इव्हेंटमध्ये अचानकपणे ढसाढसा रडताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

ही अभिनेत्री एका इव्हेंटमध्ये अचानकपणे ढसाढसा रडताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

ही अभिनेत्री एका इव्हेंटमध्ये अचानकपणे ढसाढसा रडताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 28 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये नाती जुळायला आणि तुटायला पारसा वेळ लागत नाही. काहीजण यातून लगेच सावरतात तर काही मात्र यात पूर्णपणे तुटून जातात. ब्रेकअपसारखी घटना एखाद्या खंबीर व्यक्तीलाही कशाप्रकारे हलवून टाकतो याचं उदाहरण नुकतंच एका इव्हेंटमध्ये पाहायला मिळालं. मागच्या काही दिवसांपासून मेलविन लुईसमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सना खान एका इव्हेंटमध्ये अचानकपणे ढसाढसा रडताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

सना खाननं काही दिवसांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड मेलविन लुईस याच्यासोबत ब्रेकअप झाल्याचं एका व्हिडीओमधून सोशल मीडियावर सांगितलं होतं. नुकतीच तिनं तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली. त्यावेळी मीडियाशी बोलताना अचानक तिला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत आणि ती सर्वांसमोर ढसाढसा रडू लागली. तिनं स्वतःला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते शक्य झालं नाही. शेवटी ती तिच्या सहकारी कलाकारांच्या मागे जावून आपले अश्रू पुसताना दिसली. मात्र यानंतरही तिला काही बोलणं शक्य झालं नाही. यावेळी एका व्यक्तीनं ही सर्व परिस्थिती सांभळली आणि म्हटलं, ‘ठिक आहे आपण माणसं आहोत.’

सोनाक्षी सिन्हानं केला मोठा खुलासा, 'या' कलाकारांना लगावली चपराक

सनाच्या बाजूला असलेल्या अभिनेत्री गौतमी कपूरनं तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं की मेलविनशी ब्रेकअप झाल्यानंतर सना या दुःखातून बाहेर पडू शकत नाही आहे. पण तरीही ती स्वतःला खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सना स्टेजवर रडत असताना तिचे चाहते मात्र तिच्या पाठीशी उभे राहिले. सर्वजण टाळ्या वाजवून तिला चिअरअप करताना दिसले.

अखेर अण्णा नाईकांनी शेवंता नाही तर माईंबरोबर केला रोमान्स, VIDEO एकदा पाहाच

काही दिवसांपूर्वी सना खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं मेलविन लुईसशी ब्रेकअप का केलं हे सांगितलं होतं. याशिवाय तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर सुद्धा एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं लिहिलं, ‘मला जेव्हा समजलं की त्याच्यामुळे त्याची एक विद्यार्थिनी प्रेग्नन्ट होती. त्यावेळी मला खूप दुःख झालं होतं. तो त्याच्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करत असे. त्याच्याबद्दल जेव्हा मला हे सर्व समजलं त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या याच सवयीमुळे तो अद्याप स्ट्रगल करत आहे. शेवटी देव शिक्षा देतोच.’ याशिवाय एका मुलाखतीत सुद्धा सनानं मेलविनला विश्वासघातकी आणि खोटा म्हटलं होतं. त्यासोबतच मेलविननं कशाप्रकारे तिचा विश्वासघात केला हे सुद्धा सांगितलं.

नेहा कक्करच्या ‘गोवा बीच’वर शहनाझचा धमाकेदार TikTok व्हिडीओ, चाहते म्हणाले...

First published:

Tags: Bollywood