नेहा कक्करच्या ‘गोवा बीच’वर शहनाझचा धमाकेदार TikTok व्हिडीओ, चाहते म्हणाले...

नेहा कक्करच्या ‘गोवा बीच’वर शहनाझचा धमाकेदार TikTok व्हिडीओ, चाहते म्हणाले...

शहनाज गिल तिच्या टिक टॉक व्हिडिओमुळे चांगलीचं चर्चेत आली आहे. तिच्या या टिक टॉक व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी: बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिलनं धम्माल केली. बिग बॉसच्या घरात तिला पंजाबची कॅटरिना कैफ हे नावही देण्यात आलं. बिग बॉसच्या घरात शहनाजची हिमांशु खुराना बरोबरच्या भांडणांना चांगली प्रसिद्धी मिळाली. आता तिची चर्चा आहे एका TikTok व्हीडिओमुळे. शहनाजचा टिक टॉक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

याआधी शहनाजला पंजाबी चित्रपटात साइड रोल करायची मात्र तिथं तिला लोकांनी फारशी पसंती दिली नाही. यानंतर बिग बॉस फ्रेम मिळाल्यावर शहनाज अधिक फेमस झाली आहे. तिला चाहत्यांनी तर अक्षरश: डोक्यावरचं घेतल आहे. शहनाज बिग बॉसच्या टॉप 3 कंटेस्टंट पैकी एक होती. Bigg Boss संपल्यानंतर ती सोशल मिडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शहनाज आपल्या नव्या शोच्या शूटींगमध्ये बिझी आहे तर दुसरीकडे शहनाज सोशल मिडीयावर देखिल चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे.

शहनाजने हा टिक टॉक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. नेहा कक्कड आणि टोनी कक्कडच्या गाण्यावर हा टिक टॉक व्हिडिओ तिनं केला आहे. हा व्हिडिओ नेहा आणि टोनी कक्करला देखिल टॅग केला आहे. शहजानचा हा व्हिडिओ नेहा कक्करने शेअर करत ‘क्यूटी’ अशी कमेंट केली आहे. या व्हिडिओवर टोनी कक्करने देखिल कमेंट केली आहे.

शहनाजचा हा व्हिडिओ तीच्या चाहत्यांनी देखिल शेअर केला आहे. शहजानच्या या व्हिडिओमधील क्यूट अदाकारीवर चाहते भूलले आहेत. शहनाज याआधी देखिल टिक टॉकवर व्हिडिओ शेअर करताना पाहायला मिळाली आहे. सध्या शहजान ‘मुझसे शादी करोगी’ या ‘शो’मध्ये चांगलीच बिझी आहे.

कितीही काही असलं तरी शहनाजला अजूनही सिध्दार्थ आवडतो. या जोडीचं बिनसलं असलं तरीही शहनाजच्या ट्विटरवर सिध्दार्थ शुक्लासोबतचे फोटो आहेत. सिध्दार्थनं देखिल यावर तिच्यासोबतचा फोटो शेयर करत आपल्या फॅन्सला कोड्यात टाकल आहे. अजूनही SidNaaz ची जोडी सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकत्र येणार का याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:VIDEO : SidNaaz पाहून शहनाझ गिल भडकली, रागात जाळून टाकले सर्व गिफ्ट

‘नवऱ्यामुळे बिग बॉसमध्ये सहभागी झाले नाही’, अमृता खानविलकरचा धक्कादायक खुलासा

First published: February 27, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading