मुंबई, 27 फेब्रुवारी : झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या सीरिअलने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. पहिला सीजन लोकप्रिय झाल्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले’चा दुसरं पर्वही लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये असणारी माई, अण्णा, शेवंता ही पात्र लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. अण्णा नाईक आणि माई ही तशी छोट्या पडद्यावरील गाजलेली पात्र. मात्र शेवंताच्या प्रेमात पडलेले अण्णा माईंबरोबर रोमान्स करताना यामध्ये दिसलेच नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ हिट ठरत आहेत. यामध्ये अण्णा चक्क शेवंता नाही तर माईंबरोबर रोमान्स करताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालेले व्हिडीओ पाहून माई आणि अण्णा नाईकांचा रोमान्सही तुम्हाला पाहायला मिळेल. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हे व्हिडीओ पोस्ट केले आहे. त्यामध्ये एकदम रोमँटिक अंदाजामध्ये अण्णा नाईक आणि माई दिसत आहेत. झुंज चित्रपटातील ‘निसर्गराजा ऐक सांगते...’ या प्रसिद्ध गाण्याचा एक भाग त्यांनी या व्हिडीओमध्ये चित्रीत केला आहे. पहिल्यांदा या व्हिडीओच्या माध्यमातून माईंच्या सौंदर्याचं कौतुक करताना अण्णा नाईक दिसत आहेत.
View this post on Instagramशेवटी प्रेक्षकांना दोघांचा romance पाहायला मिळतोय. 😅😅#RatrisKhelChale2 @abhyankarm @nareshakuntala
त्याचप्रमाणे अण्णा आणि माईंचा आणखी एक व्हिडीओ झी मराठीने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...’ या गाण्याचा व्हिडीओ अण्णा-माईंनी बनवला आहे.
View this post on Instagramमाई अण्णांचा हटके अंदाज. #ZeeMarathi #RatrisKhelChale2 @nareshakuntala @abhyankarm
माधव अभ्यंकर आणि शकुंतला नारे यांचा अभिनय सर्वांनाच नेहमीच आवडत आला आहे. पण त्यांचा हा रोमँटिक अंदाज पाहून तुम्ही नक्की थक्क व्हाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratris khel chale