मुंबई, 19 सप्टेंबर : अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. ‘सैराट’ चित्रपटामुळे रिंकूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या चित्रपटामुळे रिंकूला नवी ओळख मिळाली ती म्हणजे आर्ची. पहिल्याच चित्रपटात रिंकू हिट ठरली. तेव्हापासून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. रिंकू सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच रिंकूने नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रिंकूचा ट्रेडिशनल लुक पहायला मिळत आहे. काही फोटोंचं कोलाज करत रिंकूने हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओला तिने लक्षवेधी कॅप्शन दिलंय. ‘मी माझ्या भावना लपवण्याच्या खूप प्रयत्न केला पण मी हे विसरले की माझे डोळेही बोलतात’, रिंकूचं हे कॅप्शनही चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा - Sai Tamhankar : बॉलिवूडच्या ‘सिरीयल किसर’ अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी सई; नाव ऐकूण तुम्हालाही वाटेल आश्चर्य ‘माय क्रश, लाडाची रिंकू, तुझे डोळे जास्त बोलतात, डोळे कधीही खोटं बोलत नाहीत, लव, फायर’, अशा अनेक भन्नाट कमेंट रिंकूच्या नव्या व्हिडीओवर येत आहेत. तिचा हा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, रिंकू सैराटनंतर तिला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडच्या काही वर्षांत रिंकूमध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वच थक्क झाले आहेत. सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. रिंकू सध्या मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेत्री विविध धाटणीच्या भूमिका साकारत रिंकू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या स्पष्ट आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.