मुंबई, 18 जून: अभिनेत्री पूजा सावंत ( Pooja Sawant) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. पूजा नेहमीच तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. नुकतचं पूजानं तिचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. ( Pooja Sawant New Home) पण ही आनंदाची बातमी पूजाने नाही तर तिचा बेस्ट फ्रेंड अभिनेता भूषण प्रधानने ( Bhushan Pradhan) सांगितली. भूषणने सोशल मीडियावर पूजाच्या घरातील व्हिडीओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्यात. व्हिडीओमध्ये कलाकारांनी पूजाच्या घरी मजबूत दंगा केला आहे. भूषणने पूजाच्या नवीन घराची छोटी सैर व्हिडीओमधून करुन दिली आहे. पूजाने नवीन घर घेताच तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना घरीच छोटीशी पार्टी दिली. नव्या घरी भेट देण्यासाठी अभिनेता भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, श्रेय सावंत , गौरी देशमुख, मानसी कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. कलाकारांनी पूजाच्या घराची सफर करत धम्माल मस्ती केली. व्हिडीओमध्ये पूजा सावंत तिच्या नवीन घरासाठी फारच खूश दिसत आहे. भूषण आणि पूजा यांच्यात असलेली मैत्री सर्वांनाच माहिती आहे. दोघेही एकमेकांचे फार जवळचे मित्र आहेत. भूषणनं व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, ‘पू तुझ्या नव्या घरासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला तुझ्या या नव्या घरात नेहमीच आनंद मिळो. घर नेहमी आनंद हास्य आणि प्रेमानं भरुन जावो. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सावंत’.
हेही वाचा - Agnipath Scheme: अग्निपथ योजनेबाबत कंगना रणौतची भली मोठी पोस्ट, म्हणाली… पूजानं घेतलेल्या नवीन घरासाठी तिचे चाहते देखील खूश झालेत. भूषणच्या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी तिला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्यात. भूषण आणि पूजा यांच्या नात्याची गेली अनेक दिवस चर्चा आहे. दोघेही एकमेकांचे फार जवळचे मित्र आहेत. मात्र त्यांचं नातं अनेकवेळा मैत्रीच्या पुढे असलेलं दिसून आलं. दोघांचे चाहते त्यांनी याविषयी अनेक प्रश्न विचारत असतात मात्र दोघांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलेलं नाही. पूजाच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर पूजानं नुकतीच एक ‘कल्याण ज्वेलर्स’ची एक सुंदर अँड फिल्म शुट केली. मराठमोळा साज आणि कल्याण ज्वेलर्सच्या अस्सल दागिन्यांमध्ये पूजा फारचं सुंदर दिसली. त्याचप्रमाणे पूजाचे अनेक अपकमिंग प्रोजेक्ट येत आहेत. तर अभिनेता भूषण प्रधानचा नुकताच ‘अन्य’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.