जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Agnipath Scheme: अग्निपथ योजनेबाबत कंगना रणौतची भली मोठी पोस्ट, म्हणाली...

Agnipath Scheme: अग्निपथ योजनेबाबत कंगना रणौतची भली मोठी पोस्ट, म्हणाली...

Agnipath Scheme: अग्निपथ योजनेबाबत कंगना रणौतची भली मोठी पोस्ट, म्हणाली...

सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. अशातच बाॅलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रणौतनं(Kangana ranaut) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : अग्निपथ योजनेच्या भरतीवर तरुणांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. अशातच बाॅलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रणौतनं(Kangana ranaut) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत अग्निपथ योजनेला समर्थन (Kangana supports to agnipath scheme)दर्शवलं आहे. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरही अनेक प्रतिक्रिया उमटत असलेल्या दिसत आहे. हे ही वाचा -  Agnipath Scheme : राहुल गांधींनी पंतप्रधानांना लगावला ‘माफीवीर’चा टोला, म्हणाले… एकीकडे अग्निपथ योजनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. तोच दुसरीकडे कंगनानं योजनेचं समर्थन केलं आहे. कंगनानं अग्निपथ योजनेच्या समर्थनार्थ आवाज उठवला आणि सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केलं. कंगना म्हणाली की, इस्रायल सारख्या देशांनी तरुणांना सैन्य दलात भरती करणं सक्तीचं केलं आहे. काहीजण सैन्य शिस्त, राष्ट्रवाद यासाठी आयुष्यातील काही वेळ देशसेवेत घालवतात. अग्निपथ योजनेचा अर्थ फक्त करिअर बनवणे, रोजगार मिळवणे किंवा पैसे कमवणं नसून यापेक्षाही खोल अर्थ आहे. अग्निपथ योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे. जुन्या काळात प्रत्येकजण गुरुकुलमध्ये जात असे, जसे की त्यांना तसे करण्यासाठी पैसे मिळायचे. सध्याचे तरुण ड्रग्ज आणि पबजीमध्ये आपलं आयुष्य वायाला घालवत आहे. अशा तरुणांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम या योजनेमार्फत होणार आहे. सरकारनं उचलेल्या या पावलासाठी मी त्यांचं कौतुक करते.

News18

चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात कर्मचारी भरती करण्याचा प्रस्ताव असलेल्या या योजनेच्या विरोधात भारतीय लष्कराच्या इच्छुकांनी अनेक राज्यांमध्ये विरोध केला होता. यानंतर त्यापैकी 75 टक्के लोकांना पेन्शनचा लाभ न घेता सेवानिवृत्ती दिली जाईल. या योजनेत दहावी नंतर आयटीआय पदवी असलेल्यांना संधी असेल. या योजनेत सहभागी होऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना बारावी पासचे सर्टिफिकेट दिले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात