मुंबई, 20 मार्च- नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या डान्सिंग स्किलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती जिथं जाते तिथं लोकांना इम्प्रेस करत असते. नेहमीच ती सर्वांचे लक्षवेधून घेत असते. कमी काळात नोराने बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र इथंपर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींचा सामना करवा लागला तेव्हा नोरा बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री बनू शकली. यासाठी तिला तासन् तास ऑडिशन द्याव्या लागल्या आहेत. अभिनेत्रीचा 10 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्ट्रगलिंगच्या काळातील नोराचा हा व्हिडिओ आहे. नोराचा हा व्हिडिओ ‘द व्हायरल व्हिडिओज’ या चॅनेलने युट्यूबवर शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नोराचा हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल देखील ठेवलं नव्हतं. या व्हिडिओत नोराला ओळखणं देखील कठीण होतं. हा व्हिडिओ नोराच्या पहिल्या ऑडिशनचा (Nora Fatehi First Audition) असल्याचे सांगितलं जात आहे. आपली ओळख सांगितल्यानंतर नोराने जो अभिनय केला आहे ते पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. वाचा- ‘असं काम करता कशाला ज्यामुळं…’, राज कुंद्रा तोंड लपवल्यामुळे पुन्हा ट्रोल लाखावेळा पाहण्यात आला आहे हा व्हिडिओ व्हिडिओच्या सुरूवातीला नोरा तिची ओळख करून देते आणि तिचं वय सांगताना दिसत आहे. नोराच्या हातात एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड आहे, ज्यामध्ये तिच्याबद्दल माहिती लिहिली आहे. यावेळी नोरा फक्त 20 वर्षाची होती. व्हिडिओमध्ये नोरा अभिनय करताना दिसते आहे. नोराचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना देखील खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखवेळा पाहिलं गेलं आहे.
सोशल मीडियावर खूप सक्रीय असते नोरा नोरा फतेही तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि डान्समुळे अनेक तरुणाईसाठी प्रेरणास्थान बनली आहे. विशेषतः ती मुलांना खूप आवडते. नोरा तिच्या डान्ससोबतच तिच्या बोल्ड लुकमुळे देखील चर्चेत असतो. तिचे फोटो आणि व्हिडिओ यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. ती नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते.