मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Trolling हा मनोविकार आणि ...!' मृण्मयी देशपांडेने टीकेवर सोडलं मौन

'Trolling हा मनोविकार आणि ...!' मृण्मयी देशपांडेने टीकेवर सोडलं मौन

कार्यक्रम सुरू होऊन तीनच आठवडे उलटले असले तरीही अनेकांकडून या शो ला ट्रोल केलं जात आहे.  यावर मृण्मयीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

कार्यक्रम सुरू होऊन तीनच आठवडे उलटले असले तरीही अनेकांकडून या शो ला ट्रोल केलं जात आहे. यावर मृण्मयीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

कार्यक्रम सुरू होऊन तीनच आठवडे उलटले असले तरीही अनेकांकडून या शो ला ट्रोल केलं जात आहे. यावर मृण्मयीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई 17 जुलै : झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय शो ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ (Sa re ga ma pa little champs) सरू होऊन काहीच आठवडे उलटले आहेत. कार्यक्रमातील लहानग्यांचे गोड सुर प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत. कार्यक्रमाचं परिक्षण पहिल्या पर्वातील पंचरत्न म्हणजेच आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैंशपायन, रोहीत राऊत हे गायक करत आहेत. तर सुत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री मृण्मय़ी देशपांडे (Mrunmayee Deshpande) सांभाळत आहे.

कार्यक्रम सुरू होऊन तीनच आठवडे उलटले असले तरीही अनेकांकडून या शो ला ट्रोल केलं जात आहे. परिक्षकांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर सुत्रसंचालिका मृण्मयीला ही ट्रोल केलं जात आहे. यावर मृण्मयीने आपलं मत व्यक्त केलं आहे. राजश्री मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

HBD: डेअरी चालवणाऱ्या बापाचा लेक झाला अभिनेता; रवी किशनने असा केला होता संघर्ष

मुण्मयी म्हणाली, “जर या ट्रोलर्सच्या प्रोफाइल पाहिल्या तर त्यांना 5 ते 7 फॉलोवर्स असतात. त्यांनी एकही पोस्ट टाकलेली नसते. सध्या ट्रोलिंग हा बिझनेस झाला आहे. अनेक अशा एजन्सीज आहेत, ज्यांच्याशी संपर्क साधून लक्ष देऊन एखाद्या शोला ट्रोल करता येतं. मला तर खरच वाटतं की हे आधीच टपून बसलेले होते, कधी आम्ही येतो आणि ट्रोल करायला सुरूवात करतो.”

पुढे ती म्हणाली, “जर हे खरचं ट्रोलिंग असतं तर ते १ ते २ आठवड्यांनंतर सुरू झालं असतं. त्यामुळे आम्ही ट्रोलिंग जास्त मनावर घेत नाही. १२ वर्षांपूर्वी ही मुलं (परिक्षक) लहान होती. आता ती मोठी आहेत, त्यामुळे पोटशूळपणाही असतोच. मला वाटतं, माणूस मोठा होतो हे प्रेक्षक कुठेतरी विसरत चालला आहे. तुम्ही त्या पंचरत्नावंर प्रेम केलं म्हणून ते त्याचं फ्रेममध्ये अडकून राहणार आहेत का? असा सवालही तिने प्रेक्षकांना केला.”

दरम्यान स्पर्धेत 14 स्पर्धक आहेत. तर एकाहून एक सरस असे ते परफॉर्मन्स ते देत आहेत. अद्याप एलिमिनेशन राउंड सुरु झालेला नाही. तर लवकरच सुरू होणार असल्याचही मृण्मयी म्हणाली.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial