अभिनय क्षेत्रात पूर्णपणे काम सुरु करण्याच्या दिवसातले, मॉडेलिंगमध्ये आपलं नशीब आजमवताना कतरिनाचे हे फोटो आज पुन्हा व्हायरल होत आहेत.
तिने तिचे मॉडेलिंग करिअर लंडनमध्ये सुरू केले होते. त्यावेळी तिने लंडन फॅशन विकमध्ये नेहमी फीचर होणाऱ्या काही फ्रिलान्स एजन्सीमध्ये काम केले होते.
बॉलिवूडमध्ये कतरिनाने तुफान यश कमावले ते तिच्या डान्सिंग स्कील्सच्या जोरावर. सुरुवातीच्या काळात हिंदी न येणारी कतरिना आज बॉलिवूडमधील आघाडीचे चित्रपट करत आहे.
तिने 'Boom' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालल्याने तिने तेलुगू चित्रपटामध्ये आपले नशीब आजमावले
2002 आणि 2003 मध्ये तिने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. काही कालावधीतच ती सुपरमॉडेल बनली होती.
डिझायनर देखील आजही तिच्या रॅम्प वॉकचे कौतुक करतात. डिझायनर मनिष अरोरा देखील एका कार्यक्रमात म्हणाला होता की, आजही कतरिना ही सर्वात Sensuous रॅम्प वॉकर आहे.