जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्रीने केली सख्ख्या भावाची हत्या; चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

अभिनेत्रीने केली सख्ख्या भावाची हत्या; चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

अभिनेत्रीने केली सख्ख्या भावाची हत्या; चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कर्नाटक, 26 एप्रिल : कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला आपल्या भावाच्या हत्येच्या आरोपात हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनायाने राकेश काटवे याची हत्या करुन त्याचा मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले होते. या हत्येमध्ये आणखी 4 जणांचा हात आहे. पोलिसांनी सांगितलं की, राकेशचं कापलेलं डोकं देवरागुडीहलाच्या जंगलात सापडलं. तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रोडवर सापडले. मिळालेल्या माहितीनुसार धारवाड़ जिल्हा पोलिसांनी आणखी 4 संशयित आरोपींची ओळख पटवली आहे. ज्यात नियाज अहमद कटिगार (21), तौसीफ चन्नापुर (21), अल्ताफ मुल्ला (24) आणि अमन गिरानीवाले (19 यांची नावे आहेत. हे ही वाचा- रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव चित्रपटाचं प्रमोशनसाठी गेली होती शनाया राकेशची हत्या त्यांच्या घरात 9 एप्रिल रोजी झाली होती. त्यावेळी शनाया आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळी गेली होती. आरोपीने गळा दाबून राकेशची हत्या केल्याची माहिती आहे. नियाज अहमद आणि इतरांनी एका दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे गेले आणि ते शहरातील विविध ठिकाणी फेकले. गुरुवारी अभिनेत्रीला केली अटक शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. शनायाने आपल्या अभिनय कारकिर्दीती सुरुवात राघवंका प्रभूद्वारा निर्देशित 2018 मध्ये चित्रपट इदम प्रेमम जीवनम या कन्नड चित्रपटापासून केली होती.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात