...आणि म्हणून करिष्मा कपूरने 10.11 कोटींना विकला तिचा मुंबईतील फ्लॅट

...आणि म्हणून करिष्मा कपूरने 10.11 कोटींना विकला तिचा मुंबईतील फ्लॅट

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सध्या चर्चेत आहे. चित्रपटांत ती दिसत नसली तरीही सोशल मीडियावर कार्यरत असते. पण आता ती वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने विकलेल्या फ्लॅटमुळे.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी:  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सध्या चर्चेत आहे. चित्रपटांत ती दिसत नसली तरीही सोशल मीडियावर कार्यरत असते. पण आता ती वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने विकलेल्या फ्लॅटमुळे. करिष्मा आणि तिची आई बबिता कपूर यांचा पश्चिम खार भागातील त्यांचा एक फ्लॅट 10.11 कोटी रुपयांना विकला आहे. आभा दमानी यांनी हा फ्लॅट विकत घेतला.

महाराष्ट्र सरकारने रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी फ्लॅटच्या व्यवहारात भरावी लागणारी स्टँप ड्युटी कमी केली आहे. त्यानंतर बॉलिवूडमधल्या अनेक तारेतारकांनी फ्लॅटचे व्यवहार केले आहेत. या सर्वांना स्टँप ड्युटी कमी केल्याचा फायदा झाला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथे रियल इस्टेट क्षेत्र जोमात आहे. त्यात स्टँप ड्युटी कमी केल्यामुळे त्याला आणखी चालना मिळाली आहे त्याचाच फायदा हे सेलिब्रिटी घेत आहेत.

(हे वाचा- तारीख ठरली! या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी)

'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है' मध्ये काम केलेल्या करिष्माचा मुंबईतील पश्चिम खारमधील रोज क्वीन अपार्टमेंटमध्ये 10 व्या मजल्यावर फ्लॅट होता. Zapkey.com च्या वृत्तानुसार 1610 स्क्वेअर फुटांच्या या फ्लॅटची विक्री 24 डिसेंबरला झाल्याचं सरकारकडे नोंदवण्यात आलं, त्यासाठी करिष्माने 20.22 लाख रुपये स्टँप शुल्क भरलं. आभा दमानींनीही हा फ्लॅट घेतला असून त्याच्यासोबत दोन कार पार्किंगही त्यांना मिळाली आहेत.

(हे वाचा- चोरीचा आरोप झाल्यानंतर दिग्दर्शकाने केली कंगनाची पाठराखण! वाचा काय आहे प्रकरण

कोरोनामुळे सर्वच उद्योगांची अवस्था खालावली आहे. ही आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शहरांतील लोक खेड्यात परत गेल्यामुळे शहरांतील घरं मोकळी आहेत त्यांना भाडेकरू मिळत नाहीएत. एकूणातच रियल इस्टेट क्षेत्राची अवस्था अवघड झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्टँप ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्राला काहीशी चालना देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

करिष्मानी अल्ट बालाजीच्या मेंटलहूड या वेबसीरिजच्या माध्यमातून नुकताच डिजिटल डेब्यू केला. अंग्रेजी मीडियम या चित्रपटातही ती दिसली होती. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या महत्वाकांक्षी तख्त या चित्रपटातही तिची भूमिका असेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 16, 2021, 6:03 PM IST

ताज्या बातम्या