मुंबई, 5 एप्रिल: बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या फिटनेस साठी चांगलीच प्रसिद्ध आहे. तिच्या फिटनेस चे अनेकजण चाहते आहेत. दिशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार करत असते आणि त्याचे काही व्हिडिओस सुद्धा ती सोशल मिडियावर पोस्ट करत असते. यावेळी दिशाने तिच्या फिटनेसचं रहस्य (fitness secret) सांगितलं आहे. नुकताच दिशा ने सोशल मिडिया वर #AskDisha असा एक चॅट सेशन (chat session) घेतला होता. ज्यात तिने तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले होते. या सेशन मध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तरही दिली. (actress Disha Patani shares fitness mantra)
View this post on Instagram
याच सेशन मध्ये एका फॅन ने दिशा ला तिच्या फिटनेसचं रहस्य विचारलं, त्यावर दिशा ने चटकन 'मेहनत' (hardwork) असं उत्तर दिलं. त्यानंतर आणखी एका फॅनने प्रश्न केला कि कोणत्या वयात तु abbs बनवायला सुरूवात केली. त्यावर दिशाने "abbs महत्त्वाचे नाही फिटनेस महत्त्वाचा आहे. बाकी सगळं बोनस मध्ये मिळतं". असं दिशा म्हणाली.
View this post on Instagram
दिशा ही सोशल मिडीया वर फार सक्रिय असते. तिचा बोल्ड (bold) अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडतो. तर तिचे फिटनेस व्हिडिओ सुद्ध फारच हिट ठरतात. याच बरोबर ती स्वत: स्टंट देखिल शिकते. त्याचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account) वर पोस्ट केले आहेत. त्यामुळे दिशा स्वत:ला फिट ठेवण्यायाठी फारच मेहनत घेत असते.
पहिल्या शोसाठी किती रुपये मिळाले? दया बेननं सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा
दिशा अभिनेता सलमान खान (salman khan) सोबत 'राधे'(Radhe) या चित्रपटात दिसणार आहे. तर 'एक विलन रिटर्न्स' (ek villain returns) या अपकमिंग चित्रपटातही ती दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Disha patani, Fitness