Home /News /entertainment /

हेमांगी कवीनं हेक्टिक शेड्युवर शोधला रामबाण उपाय ! तब्ब्ल 16 तास केलं 'हे' काम

हेमांगी कवीनं हेक्टिक शेड्युवर शोधला रामबाण उपाय ! तब्ब्ल 16 तास केलं 'हे' काम

मराठी मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या पाचवीला पुजलेलं हेक्टिक शेड्युल आजही तसंच आहे. यात कलाकारांची अनेकदा तारांबळ उडताना दिसते. अभिनेत्री हेमांगी कवीने (hemangi Kavi) यावर उपाय शोधला आहे. अशाच काहीश्या संदर्भांत तिने केलेली पोस्ट सध्या गाजत आहे

पुढे वाचा ...
  मुंबई 28 मे: हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही अभिनेत्री इन्स्टाग्रामवर प्रचंड ऍक्टिव्ह असते. अनेकदा तिच्या मजेदार रील्समुळे(hemangi kavi reels) प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. अनेकांचा शीण त्या विनोदी रील्समुळे निघून जातो. आपल्या  कामाबद्दल आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींबद्दल हेमांगी कायम अपडेट्स  चाहत्यांसोबत शेअर करत असते.सध्या तिच्या रिसेन्ट पोस्टची सोशल मीडियावर  जोरदार चर्चा होत आहे. दररोज 12 तासांपेक्षा जास्त सेटवर घालवणाऱ्या, उन्हातान्हात वेळेत हयगय न करता काम करणाऱ्या कलाकारांची झोपेबद्दल कायमची तक्रार असते. शिफ्टच्या वेळा खूपदा पुढे मागे असल्याने त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. अनेकदा नाईट शिफ्ट्समुळे आराम मिळत नाही. मात्र संधी मिळाली की अनेकदा कलाकार सुट्टी घेऊन विश्रांतीला महत्त्व देताना दिसतात. कोणी ट्रिप प्लॅन करतं तर कोणी व्यायामाकडे लक्ष देतं. अभिनेत्री हेमांगी कवीने मात्र चक्क 16 तास झोप काढली आहे. वाचा- तिने याबद्दल एक मजेदार पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. ती असं लिहिते, "बऱ्याच दिवसांपासून कामानिमित्त बरीच धावपळ, प्रवास चालू होता, झोपेचं खोबरं झालं होतं. काल लवकर pack up झाल्यामुळे व्यवस्थित झोपायला मिळालं आणि मी ही घोडे बेचके झोपून गेले, 16 तास. झोपेचा backlog भरून काढल्यासारखं झालं. आज उठल्यावर इतकं कमाल वाटत होतं. मन, डोकं सगळं थाऱ्यावर असल्यासारखं. Energy revive झाली आणि कोऱ्या पाटीने पुन्हा कामाला सुरुवात.आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण झोपच आहे याचा साक्षात्कार झाला!" वाचा- कलाकारांच्या आयुष्यात अराम करणं किती महत्त्वाचं आहे हे यातून जाणवतं. सतत वेगवेगळे इव्हेंट्स, दौरे, शूट्स करून त्यांनाही प्रचंड थकवा येतो आणि आरामाच्या बाबतीत हयगय न करता त्यांनीही पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे हे यावरून कळतं.
  कोरोनाच्या मोठ्या संकटामुळे सर्वच कलाकार आपल्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत आणि ते चाहत्यांनाही जागरूक करत आहेत. धकाधकीच्या आयुष्यात पैसे, काम यासोबत पुरेशी झोप, आराम, व्यायाम आणि योग्य आहार यांना महत्त्व देणंही तेवढंच गरजेचं आहे. झोपेने शरीर ताजतवानं होतं आणि काम करायला नवी ऊर्जा येते हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे ही वाचा- कोणते आहेत रणदीप हूडासारखे आणखी 11 underrated बॉलिवूड अभिनेते? हेमांगी आपल्याला सध्या 'लेक माझी दुर्गा' या मालिकेत आईची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय तिच्या सिक्रेट प्रोजेक्टबद्दल सुद्धा हळूच एक अपडेट देत तिने इन्स्टाग्रामवर मागे पोस्ट केली होती. तो प्रोजेक्ट काय आहे अजून समजलं नसलं तरी उत्सुकता कायम ठेवत तिने काहीतरी खूप महत्त्वाच्या मुद्द्याशी निगडित आहे अशी माहिती दिली आहे. हेमांगी येत्या काळात तमाशा लाईव्ह चित्रपटात दिसणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Shooting

  पुढील बातम्या