समंथा अक्किनेनी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.क्यूट लूक आणि जबरदस्त अभिनयशैलीच्या जोरावर तिनं सिनेसृष्टीत स्वत:च असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.
2/ 10
आज समंथाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांची तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज समंथा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाट्ल कधीकाळी ती केवळ 3 हजार रुपयांसाठी 12 तास कॉलसेंटरमध्ये काम करत होती.
3/ 10
समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 साली तमिळनाडूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.
4/ 10
तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय स्पर्धा, नाट्यस्पर्धा, सार्वजनिक कार्यक्रम यांमध्ये अभिनय करुन ती आपली हौस भागवत असे.
5/ 10
कॉलेजमध्ये असताना तिनं अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. अन् त्यासाठी तिला शहरात राहावं लागणार होतं. परंतु शहरात राहण्याचा आर्थिक भार उचलण्यासाठी सुरुवातीला ती एका कॉलसेंटरमध्ये काम करावं लागलं.
6/ 10
तिला महिन्याला कुटुंबीयांकडून थोडा पॉकेटमनी मिळत असे पण तो पुरेसा नव्हता म्हणून तिनं हे काम सुरु केलं होतं. या ठिकाणी 12 तासांचे तिला केवळ 3 हजार रुपये मिळत असे.
7/ 10
सुट्टीच्या दिवशी ती विविध ठिकाणी जाऊन ऑडिशन देत होती. अन् अशाच एका ऑडिशनमुळं तिला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
8/ 10
पुढं जाहिरातीमधून तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 2010 साली ये माया चेवसे या चित्रपटातून तिनं फिल्मी करिअरची सुरुवात केली.
9/ 10
तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर तिनं एकामागून एक अनेक सुपहिट चित्रपटांमध्ये काम केलं. अन् आज ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
10/ 10
3 वर्षांपूर्वी तिनं सुपरस्टार नागार्जुना यांच्या मुलासोबत लग्न केलं. कधीकाळी तीन हजार रुपयांसाठी 12 तास काम करणारी समंथा आज कोट्यवधींची मालकीण म्हणून ओळखली जाते.