Home /News /entertainment /

‘असाच चमकत राहा…!’ दिशा पाटनीनं आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘असाच चमकत राहा…!’ दिशा पाटनीनं आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला दिशानं ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्यानं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई, 13 जून : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज 28 वा वाढदिवस आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस आजच आहे. मागच्या वर्षभरात दिशा आणि आदित्य यांच्या नावाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. दरम्यान आज आदित्य यांच्या वाढदिवसाला दिशानं ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्यानं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दिशा पाटनीनं आदित्य ठाकरे यांना ट्विटरवनरून शुभेच्छा दिल्या. तिनं लिहिलं, ‘वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा...’ यासोबत दिशानं स्माइली आणि हार्टवाला इमोजी सुद्धा पोस्ट केला आहे. दिशाच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर आदित्य आणि दिशाच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईला झाला कोरोना, दिल्ली सरकारकडे केली मदतीची मागणी मागच्या वर्षी एका डिनर डेटनंतर दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांना एकत्र स्पॉट केलं गेलं होतं आणि त्यानंतर या दोघांच्या नावाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर एका मुलखातीत दिशानं आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय काही महिन्यांपूर्वी संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला होता. ज्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली होती. यावेळी अवधूत गुप्तेंनी दिशाचं नाव न घेता आदित्य ठाकरेंची फिरकी घेतली होती. मात्र आदित्यनं तुमची दिशा चुकतेय असं म्हणत त्यांना धम्माल उत्तरही दिलं होतं. या मुलखतीतला हा किस्सा खूप गाजला होता. टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Bollywood, Disha patani

    पुढील बातम्या