जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...

टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...

टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण...

दिशाचा एक्स बॉयफ्रेंड सुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे. एक वेळ अशी होती की हे दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून : बॉलिवूडमध्ये बोल्डनेससोबतच अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. आज दिशाचा 29 वा वाढदिवस. सध्या बॉलिवूडमध्ये दिशा आणि टायगर अफेअरच्या चर्चा अनेकदा होताना दिसतात. पण काही दिवसांपूर्वी मात्र दिशाचे एक्स बॉयफ्रेंडसोबत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं ती खूप चर्चेत आली होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड सुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे. एक वेळ अशी होती की हे दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. मात्र नंतर काही असं झालं की दोघांनीही आपापले मार्ग बदलले. दिशा पाटनी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागची भूमिका साकारत आहे. दिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास 1 वर्ष पार्थला डेट करत होती. पण अचानक या दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ दिशाला चिट करत होता आणि याबाबत दिशाला समजल्यावर तिनं पार्थ पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं. पार्थसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा बराच काळ दुःखी होती. पण नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवण्याकडे भर दिला. सध्या पुन्हा एकदा दिशा आणि पार्थचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यासोबत त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा.

जाहिरात

पार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा आणि टायगर एकमेकांना भेटले. मागच्या काही वर्षांपासून टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही कबुली दिली नसली तरीही दोघांचे कुटुंबीयही एकमेकांशी खूप जवळचे आहेत. रिलेशिपबाबत बोलणं टायगर आणि दिशा नेहमी टाळत असले तरीही त्याचे सोशल मीडियावरील फोटो बरंच काही सांगून जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात