'क्रिश 4' मध्ये 17 वर्षानंतर पुन्हा 'जादू' परत येण्याची शक्यता, स्वत: हृतिकने दिले संकेत

'क्रिश 4' मध्ये 17 वर्षानंतर पुन्हा 'जादू' परत येण्याची शक्यता, स्वत: हृतिकने दिले संकेत

क्रिश-4 मध्ये 'कोई मिल गया' मधील खूप गोड कॅरेक्टर परत येणार आहे. हो! आम्ही 'जादू' बद्दल बोलत आहोत.

  • Share this:

मुंबई, 22 मे : हृतिक रोशन स्टारर 'क्रिश' फ्रँचायझी बॉलिवूडमध्ये विशेश प्रसिद्ध ठरली आहे. अगदी 'कोई मिल गया' पासून 'क्रिश-3' पर्यंत सर्व चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या चित्रपटातील काही दृश्यांवर टीका देखील झाली होती. मात्र सध्या क्रिश-4 ची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाबाबत काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे तर लवकरच त्याबाबत घोषणा केली जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे क्रिशमध्ये 'कोई मिल गया' मधील खूप महत्त्वाचे कॅरेक्टर परत येणार आहे. हो! आम्ही 'जादू' बद्दल बोलत आहोत. 'कोई मिल गया' या चित्रपटाला हिट बनवण्यासाठी 'जादू'ची (Jaadu) खूप महत्त्वाची भूमिका आहे.

'जादू'ने 'कोई मिल गया'मध्ये रोहित मेहरा म्हणजेच 'हृतिक'ला स्मार्ट बनवण्याचे काम केले होते. मुंबई मिररच्या एका अहवालानुसार राकेश रोशन क्रिश-4 मध्ये जादूला परत आणण्याच्या विचारात आहेत

(हे वाचा-अमिताभ-आयुष्मान करणार मालक-भाडेकरू बनून तु तु मैं मैं! 'गुलाबो सिताबो'चा ट्रेलर)

क्रिशच्या सर्व टीमबरोबर मिळून ते या चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहेत आणि जादूला परत आणले जाऊ शकते. असं झाल्यास 17 वर्षानंतर बच्चेकंपनीचा आवडता 'जादू' पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर दिसणार आहे.

मुंबई मिररशी बातचीत करताना हृतिक रोशनने देखील असे संकेत दिले आहेत की क्रिश सीरिजमधील पुढील सिनेमात जादू पुन्हा एकदा दिसू शकतो. 2003 मध्ये 'कोई मिल गया' प्रदर्शित झाला होता. यामध्ये हृतिकबरोबर रेखा, प्रीति झिंटा यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. यामध्ये इंद्रवर्धन पुरोहितने जादूची भूमिका केली होती. या अभिनेत्याचा 2014 मध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ही भूमिका कोण करणार असा प्रश्न आहे. कास्टची घोषणा झाल्यानंतरच याबाबतचे  कोडे उलगडेल.

First published: May 22, 2020, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading