मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनू सूदचा मजुरांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात, नोकरी शोधण्यासाठी लाँच केलं अ‍ॅप

सोनू सूदचा मजुरांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात, नोकरी शोधण्यासाठी लाँच केलं अ‍ॅप

अभिनेता सोनू सूदकडून प्रवासी मजूरांना अजूनही मदत केली जात आहे.  आता मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अ‍ॅप लाँच केले आहे.

अभिनेता सोनू सूदकडून प्रवासी मजूरांना अजूनही मदत केली जात आहे. आता मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अ‍ॅप लाँच केले आहे.

अभिनेता सोनू सूदकडून प्रवासी मजूरांना अजूनही मदत केली जात आहे. आता मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अ‍ॅप लाँच केले आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 23 जुलै : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कोरोना व्हायरस पँडेमिकनंतर (Coronavirus Pandemic) देशातील प्रवासी मजुरांची मदत करत आहे. महाराष्ट्रातील विविध मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये सुखरूप पोहोचवल्यानंतर अभिनेत्याने आणखी एक चांगले काम केले आहे. प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अ‍ॅप लाँच केले आहे. 'प्रवासी रोजगार' असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप प्रवासी कामगारांना नोकरी शोधण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देईल. प्रवासी कामगारांना, मुंबई पोलिसांना मदत केल्यानंतर सोनूने हे अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. मुंबई मिररच्या एका अहवालानुसार, सोनू सूदने अशी माहिती दिली आहे की गेल्या काही महिन्यांपासून हे अ‍ॅप डिझायन करण्याचा विचार केला होता. त्यानंतर योजना आखून तयारी करण्यात आली. यासंदर्भात अव्वल संस्थांशी व्यापक चर्चा झाली आहे. स्वयंसेवी संस्था, परोपकारी संस्था, सरकारी अधिकारी, रणनीती सल्लागार, तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि सर्व प्रवाशांना ज्यांना त्यांच्या घरी पोहोचवले त्या सर्वांशी चर्चा झाली असल्याचं तो म्हणाला. (हे वाचा-पेन्शन आणि इन्शूरन्स सेवा देण्याच्या तयारीत WhatsApp, लवकरच होणार निर्णय) अहवालानुसार, विविध क्षेत्रांतील सुमारे 500 कंपन्या या पोर्टलवर बांधकाम, परिधान, आरोग्य, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, वाहन, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देतील. हे अ‍ॅप कामगारांना काही मूलभूत प्रशिक्षणासह इंग्रजी कसे बोलायचे ते देखील शिकवेल. सध्या इंग्रजीमध्ये असणारे हे APP लवकरच 5 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे कामगारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास काही गोष्टी सुखकर होतील. हे अ‍ॅप विनाशुल्क आहे. अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत बर्‍याच लोकांना सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले आहे. त्याचप्रमाणे त्याने मुंबई पोलिसांना देखील 25000 फेस शिल्डची मदत केली होती. अलीकडेच सोनू सूदने केलेल्या मदतीमुळे एका प्रवासी मजुराने सोनू सूदच्या नावाने वेल्डिंगचे दुकान उघडले.
First published:

Tags: Sonu Sood

पुढील बातम्या