मुंबई 14 ऑगस्ट: अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या बरीच चर्चेत आहे. अमृताने चंद्रमुखी सिनेमांनंतर वेगवेगळी यशाची शिखरं गाठायला सुरुवात केली आहे. येत्या काळात अमृता झलक दिखला जा कार्यक्रमात दिसणार आहे. अमृताच्या या यशस्वी घोडदौडीत महत्त्वाचा सहभाग असलेली तिची एक अत्यंत जवळची व्यक्ती तिला सोडून गेली असल्याचं समोर आलं आहे. अमृताने आज एक सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या या जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अमृताच्या मावशीने नुकताच या जगाचा निरोप घेतल्याचं समोर आलं आहे. तिच्या आयुष्यात तिच्या मावशीचं फार मोलाचं स्थान असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. ती असं म्हणते, “आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा …. छान रहा …. नीट रहा. आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा … तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी…. आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही मम्मा … मी … अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ तुला खूप मिस करणार ग तुला …. खूप.. अजून आपल्याला किती फिरायचं होतं बोलायचं होतं …. मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं पण माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस.”
अमृतासाठी तिची मावशी एक अत्यन्त महत्त्वाची व्यक्ती होती. मावशीपेक्षा अधिक तिची आई बनून तिने अमृताला सांभाळलं असं ती पोस्टमध्ये म्हणते. अमृताला खऱ्या स्त्रीशक्तीचा अर्थ सुद्धा तिच्या मावशीमुळे कळलं असं ती सांगते. हे ही वाचा- Amruta Khanvilkar: बिल्डिंगच्या पार्किंगपासून ते धकधक गर्लसोबत डान्स; चंद्राची रियल लाईफ डान्स जर्नी आहे एकदम झकास तिच्या आयुष्यातली एक अत्यंत जवळची व्यक्ती गेल्याचं दुःख अमृताने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सध्या अमृता वर्क फ्रंटवर खूप ऍक्टिव्ह आहे. तिने नुकतीच तिची डान्स जर्नी चाहत्यांसोबत शेअर केली. बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये तिच्या नृत्याची सुरुवात झाली. गणेशत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं त्यामध्ये तिने नाच करायला सुरुवात केली असं तिने यादरम्यान सांगितलं आहे.