Home /News /entertainment /

‘प्यार हमे किस मोड पे ले आया..’; विवेक ओबेरॉयने अनुभवातून दिलेला सल्ला चाहत्यांना भावला

‘प्यार हमे किस मोड पे ले आया..’; विवेक ओबेरॉयने अनुभवातून दिलेला सल्ला चाहत्यांना भावला

व्हॅलेंटाईन्स डे ला अभिनेता विवेक ओबेरॉयला विनाहेल्मेट दुचाकी वापरल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. आता विवेकने पुढे येत उघडपणे आपली चूक मान्य केली आहे.

  मुंबई, 20 फेब्रुवारी: अभिनेता विवेक ओबेरॉयने सोशल मीडियाच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा पोस्ट करत बाईक चालवताना हेल्मेट न वापरण्याची आपली चूक स्वीकारली आहे. आणि सोबतच मुंबई पोलिसांचे देखील आभार मानले आहेत. याचबरोबर त्याने त्याच्या सर्व चाहत्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विवेक ओबेरॉयने ट्वीट करत आपली चूक स्वीकारली आहे. विवेक म्हणतोय, ‘ प्यार हमे किस मोड पे ले आया, निकले थे बाईक पर हम और हमारी जान, बिना हेल्मेट के कट गया चलान! जर तुम्हीसुद्धा हेल्मेटशिवाय बाईक चालवत असाल तर मुंबई पोलीस तुम्हाला चेकमेट करतील. सुरक्षितता नेहमीच सर्वात महत्वाची असते हे मला लक्षात आणून देण्यासाठी धन्यवाद मुंबई पोलीस! सुरक्षित रहा, हेल्मेट आणि मास्क अवश्य लावा!’ याबाबत अधिक माहिती अशी की, व्हॅलेंटाईन्स डे ला अभिनेता विवेक ओबेरॉयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तो आपल्या पत्नी सोबत नव्या बाईक राईडचा आनंद घेताना दिसत आहे. मात्र यावेळी तो हेल्मेट आणि मास्क लावायला विसरल्याने समाजसेवक बिनु वर्गीस यांनी ही बाब ट्विटरच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत विना हेल्मेट मोटरसायकल चालवल्याबद्दल 500 रुपयांचा ई-चलनद्वारे दंड देखील आकारला.

  अवश्य वाचा -     मुलाच्या कस्टडीसाठी श्वेता तिवारीच्या पतीची हायकोर्टात धाव; केले धक्कादायक खुलासे

  विवेकचं हे ट्वीट पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकाने तो खरच खूप मोठया मनाचा अभिनेता आहे असं म्हटलंय तर खूप लोकांनी आपली चूक उघडपणे मान्य केल्याबद्दल त्याचं कौतुक केलंय.
  Published by:news18 desk
  First published:

  Tags: Mumbai police, Social media, Vivek oberoi

  पुढील बातम्या