टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी दीर्घकाळ पती अभिनव कोहलीपासून दूर राहत होती. अशा परिस्थितीत या दोघांचा मुलगा रेवांश श्वेता तिवारीसोबत राहत आहे. अभिनव कोहलीने श्वेता तिवारीविरूद्ध अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. टीव्ही अभिनेता आणि श्वेता तिवारीच्या पतीने मुलगा रेयांश याच्या कस्टडीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
वकीलांच्या म्हणण्यानुसार,अभिनवला त्याचा मुलगा कुठे आहे हेदेखील माहित नसतं. त्याने श्वेताशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, पण श्वेताने त्याच्या प्रत्येक प्रयत्नाकडे दुर्लक्ष केलं. अभिनवने पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्नही केला, पण तो अपयशी ठरला. अखेर अभिनवने आपल्या हक्कांसाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. ( Photo Credit- @abhinav.kohli024/Instagram)
तृप्ती पुढे म्हणाल्या की, डिसेंबर 2020 मध्ये हायकोर्टाने नोटीस बजावली होती आणि 5 जानेवारीला आमचं प्रकरण कोर्टात लिस्ट झालं. श्वेता त्यादिवशी तिथे हजर राहिली होती आणि तिने तिचा वकील नेमण्यासाठी वेळ मागितला होता. आम्ही श्वेताशी सहमती दर्शविली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरी रेयांशला अभिनवला भेटू देण्यास विनंती केली. (Photo credit- @shweta.tiwari/Instagram)