मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांतलाही मिळाली होती Fairness cream ची जाहिरात; धुडकावली कोट्यवधींची ऑफर

सुशांतलाही मिळाली होती Fairness cream ची जाहिरात; धुडकावली कोट्यवधींची ऑफर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (sushant singh rajput) फेअरनेस क्रिमची (fairness cream) जाहिरात करण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (sushant singh rajput) फेअरनेस क्रिमची (fairness cream) जाहिरात करण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (sushant singh rajput) फेअरनेस क्रिमची (fairness cream) जाहिरात करण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती.

    मुंबई, 26 जून : फेअर अँड लव्हलीतून (Fair & lovely) फेअर काढला जाणार असल्याचा निर्णय हिंदुस्तान कंपनीने घेताच सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. फक्त सामान्य नागरिकच नव्हे तर अगदी बॉलीवूड सेलिब्रिटींनीही या निर्णयाचं स्वागत केलं. विशेष म्हणजे याआधी काही बॉलीवूड कलाकारांनी फेअरनेस क्रिमच्या (Fairness cream) जाहिराती नाकारल्यात. तुम्हाला माहिती नसेल मात्र त्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही (Sushant Singh Rajput) समावेश आहे.

    सुशांतलादेखील एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची मोठी ऑफर आली होती. ही जाहिरात करण्यासाठी त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 15 कोटी रुपये मिळणार होते. मात्र फेअरनेस क्रिमची जाहिरात करणं त्यांना पटलं नाही. त्यामुळे त्याने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात धुडकावली.

    अभिनेत्री कंगना रणौत, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, कल्कि केकला याशिवाय रणबीर कपूर, अभय देओल, रणदीप हुड्डा यांसारख्या कलाकारांनीही फेअरनेस क्रिमची जाहिरात करणं नाकारलं.

    हे वाचा - FAIR & LOVELY तील 'फेअर' घालवण्यासाठी लढली ही मुंबईची मुलगी

    अमेरिकेतील कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह जगभरात ब्लॅक लिव्ह्ज मुव्हमेंट सुरू झालं. ज्याचा परिणाम आता भारतातही झाल्याचं पाहायलं मिळतं आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरला फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रिमच्या ब्रँडमुळे टिकेला सामोरं जावं लागलं. यानंतर कंपनीने आपल्या ब्रँडमधील फेअर शब्द हटवण्याचा निर्णय घेतला.

    हे वाचा - FAIR & LOVELY तून फेअर जाणार असल्याने ही अभिनेत्री आनंदी, VIDEO तून झाली व्यक्त

    1975 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरने (Hindustan Unilever) एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद करत असल्याची, गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली. त्यामुळे आता आपल्या या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला. सौंदर्य फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नाही. त्यामुळे फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग असे शब्दच हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये नसणार आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे.

    संपादन - प्रिया लाड

    First published:

    Tags: Fairness cream, Sushant Singh Rajput