मुंबई, 22 मे: मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या प्रोफेशनल लाइफमध्ये सक्सेस आहेतच तर परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांनी तितकचं यश मिळवलं आहे. मराठी सिनेसृष्टीत एकाहून एक अप्रतिम बायोपिक ज्याच्या नावे आहेत असा बहुगुणी अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave) सुबोध सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करतोय. असं असलं तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतो. सुबोधच्या यशात आई वडिलांनंतर सर्वांच मोठा वाटा हा त्याच्या पत्नीचा देखील आहे. पत्नीवरील प्रेम वेळोवेळी व्यक्त करतानाही दिसतो. सुबोधची पत्नी म्हणजचे मंजिरी सुबोध भावे (Manjiri Subodh Bhave) मंजिरी उत्तम बायको आहेच परंतु ती सक्सेकफुल कंम्प्युटर इंजिनिअर देखील आहे. मंजिरीने नुकताच 'आसोवा' या यू ट्यूब चॅलनला दिलेल्या मुलाखतीत सुबोध आणि तिच्या नात्याविषयीच्या काही इंट्रेस्टिंग गोष्टी सांगितल्या. दोघेही एकेकाळी लाँग डिन्टन्स रिलेशनशिपमध्ये देखील होते.
सुबोध आणि मंजिरी दोघेचे पुण्याचे आहेत. सुबोध आणि मंजिरी यांची ओळख लहानपणापासूनची आहे. मंजिरी आठवीत आणि सुबोध दहावीत असताना दोघांची पुण्यातील एका नाट्यशिबीरात मंजिरी आणि सुबोध यांची ओळख झाली. शालेय शिक्षणानंतर मंजिरी आई वडिलांसोबत कॅनडाला शिफ्ट झाली. तेव्हा 5 वर्ष मंजिरी आणि सुबोध लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी एकमेकांशी तुम्ही संवाद कसे साधायचा? कसे बोलायचा? याविषयी सांगताना मंजिरी म्हणली, आम्ही पाच वर्षांची लाँग डिस्टन्स रिलेशनशिप सक्सेसफुल केली आहे. लाँग डिस्टन्स रिलेशन त्याकाळी मॅनेज करणं फार सोप्प होतं. कारण त्यावेळी सोशल नेटवर्किंग एवढं मोठं नव्हतं. पाच वर्ष आम्ही एकमेकांना खूप पत्र लिहिली. त्यावेळी Yahoo Massanger वर आम्ही बोलायचो.
हेही वाचा -
हृता दुर्गुळे-प्रतीक शाहने हनिमूनसाठी निवडलं 'हे' ठिकाण, शेअर केले रोमँटिक PHOTO
भारतातून फोन करणं तेव्हा अवघड जायचं
मुलाखतीत मंजिरी पुढे म्हणाली, मला कॅनडामधून फोन करणं तेव्हा फार सोप्प होतं. तेव्हा मी त्याला फोन करायचे. पण भारतातून फोन करायचं म्हटलं तर ते फार अवघड जायचं. सुबोधकडे शंभर रुपये असतील तर तो मला फोन करुन, कशी आहेस मंजिरी... ओके ओके... मी बरा आहे, असं म्हणून मिनिटात फोन ठेवायचा. संपले शंभर रुपये.
आय लव्ह यूचं उत्तर यायला दीड दोन महिने लागायचे
मंजिरी आणि सुबोध फोनवर फार कमी बोलले पण त्यांचा पत्रव्यवहार फार होत असतं. त्याविषयीचा किस्सा सांगताना मंजिरी म्हणाली, मी पत्र लिहिल्यानंतर ते सुबोधला मिळेपर्यंत 15-20 दिवस जायचे. त्यानंतर त्याचं उत्तर मिळेपर्यंत पुन्हा 15-20 दिवस लागायचे. मी लिहिलेल्या आय लव्ह यूला आय लव्ह यू टू यायला दीड ते दोन महिने लागायचे. पण आताचा जमाना फार बदलला आहे आताचं आय लव्ह यू फार कमी टिकतात, आमचं खूप वर्ष टिकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.