मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या पती प्रतीक शाहसोबत कॉलिटि टाइम स्पेंड करत आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या हनिमूनचे फोटो समोर आले आहेत. हृता दुर्गुळेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये प्रतीक हॉटेलमध्ये बसून पदार्थांचा आस्वाद घेताना दिसून येत आहे. तर इतर दोन फोटोंमध्ये हृता आणि प्रतीक रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. हृता आणि प्रतीकने आपल्या फोटोमध्ये ठिकाण मेन्शन केलं आहे. सध्या हे दोघे सेलिब्रेटी कपल इस्तंबुल, टर्कीमध्ये आपला हनिमून साजरा करत आहेत. या दोघांनी नुकतंच मुंबईमध्ये अगदी खाजगी पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.